शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सलग पाच दिवस एकाच वेळी सात ठिकाणी रंगणार युवास्पंदन-२०१८ महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 12:05 IST

संगीत, नृत्य, नाटय, ललित कला व साहित्य अशा २७ विविध कला प्रकारांच्या सादरीकरणाची सांस्कृतिक मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : युवास्पंदन-२०१८ आंतरविद्यापीठीय महोत्सवयुवास्पंदन आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव लोगोचे अनावरण४ राज्यांमधील १४० विद्यापीठातील २ हजार विद्यार्थी सहभागी होणार आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवाचा मुख्य मंडप हा मुख्य इमारतीजवळील मोकळया मैदानात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या १९ ते २३ डिसेंबर २०१८ दरम्यान आयोजित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात दि. १९ ते २३ डिसेंबर दरम्यान आंतरविद्यापीठीय युवास्पंदन पश्चिम विभाग युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सलग ५ दिवस एकाच वेळी ७ ठिकाणी लोककला, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, समुह गायन,  प्रश्नमंजुषा, वादविवाद आदी स्पर्धा पार पडणार आहेत. राजस्थान, गुजराथ, गोवा व महाराष्टÑ या राज्यातील दोन हजार विद्यार्थी आपापल्या संस्कृतींचे प्रतिनिधीत्व या महोत्सवामध्ये करणार आहेत. त्यांच्याकडून सादर केल्या जाणाºया कलांमुळे पुणेकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवाचा मुख्य मंडप हा मुख्य इमारतीजवळील मोकळया मैदानात असणार आहे. त्याचबरोबर नामदेव सभागृह, पुम्बांचे सभागृह, आयुका सभागृह, सेवक विहार, कॉमर्स विभाग हॉल, संत ज्ञानेश्वर सभागृह अशा ७ ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रम होणार आहेत. मुख्य मंडपामध्ये लोककलांचे सादरीकरण होईल. संत नामदेव सभागृहात एकपात्री सादरीकरण, पुम्बां सभागृहात शास्त्रीय संगीत, आयुका सभागृहात शास्त्रीय नृत्य, सेवक विहार येथे रांगोळी व मेहंदी स्पर्धा, कॉमर्स सभागृहात प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा तर ज्ञानेश्वर सभागृहात समुह गायन स्पर्धा होणार आहेत. सकाळी साडे नऊ वाजल्यापासून रात्री उशीरपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस याची माहिती दिली. या महोत्सवासाठी १ कोटी २५ लाख रूपये खर्च येण्याचा अंदाज आहे. उद्योजक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून प्रायोजकत्व, देणगी मिळविण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.कॅम्पसमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्थायुवा महोत्सवासाठी १४० विद्यापीठांमधून २ हजार विद्यार्थी, त्यांचे संघ व्यवस्थापक येणार आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था विद्यापीठ कॅम्पसमध्येच करण्यात येणार आहे. नव्यानेच बांधण्यात आलेले सोशल सायन्स कॉम्पलेक्स, कर्मचारी आवास येथे राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्येष्ठ कलाकरांचा कटटयंदाच्या आंतरविद्यापीठीय महोत्सवामध्ये ज्येष्ठ कलाकरांचा कटट असा एक नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये ज्येष्ठ कलाकारांना आमंत्रित करून त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर प्रसिध्द कलाकारांच्या कलांच्या सादरीकरणाचे कार्यक्रमही या महोत्सवामध्ये असणार आहेत. 

............

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या १९ ते २३ डिसेंबर २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘युवास्पंदन-२०१८’ या आंतरविद्यापीठीय पश्चिम विभाग युवा महोत्सवाच्या लोगोचे बुधवारी अनावरण करण्यात आले. या महोत्सवामध्ये महाराष्ट्र , गोवा, गुजरात व राजस्थान या ४ राज्यांमधील १४० विद्यापीठातील २ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. संगीत, नृत्य, नाटय, ललित कला व साहित्य अशा २७ विविध कला प्रकारांच्या सादरीकरणाची सांस्कृतिक मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवाRajasthanराजस्थानStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ