पुणे - कर्वेनगर परिसरात हमास या वादग्रस्त संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर्स वाटणाऱ्या काही तरुणांना भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अधिकच्या माहितीनुसार, काही तरुणांनी कर्वेनगर परिसरात हमासच्या समर्थनार्थ पोस्टर्स वाटण्यास सुरुवात केली. या घटनेची दखल घेत स्थानिकांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित तरुणांना चोप दिला. दरम्यान, काहींनी या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केले.या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पुण्यात हमास समर्थनाचे पोस्टर्स वाटणाऱ्या तरुणांना मारहाण; पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 15:55 IST