पुणे : कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरुन विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़. अविनाशकुमार कृष्णचंद धिमन (वय ३४, रा़ दत्तनगर, शास्त्रीनगर) असे या तरुणाचे नाव आहे़. याबाबत कोथरुड पोलिसांनी सांगितले की, शास्त्रीनगरमधील दत्तनगरमध्ये एका घरातून वास येत असून आतून घर बंद आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून दुपारी चार वाजता कोथरुड पोलिसांना कळविण्यात आली़. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कडी तोडून आत प्रवेश केला असता आत अविनाशकुमार हे पलंगावर पडलेले होते़. त्याच्या टेबलावर पिरंगुट येथील एका कंपनीचा मेमो पडलेला होता़. त्यात आठ दिवस कामाला न आल्याने त्यांना हा मेमो दिल्या होता़. घरात दोन तीन बाटल्या सापडल्या असून त्यावरुन त्याने विष पिऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे़. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, अविनाशकुमार हे मुळचे हिमाचल प्रदेश मधील राहणार आहेत़. गेल्या १७ ते १८ वर्षांपासून ते पुण्यात असून पिरंगुटमधील एका कंपनीत ते टेक्निशियन म्हणून काम करत होते़.गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशी संपर्क नव्हता़. कोथरुड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठविला असून त्यानंतरच मृत्युचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले़.
कोथरुडमध्ये तरुणाची विष पिऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:04 IST
कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरुन विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़.
कोथरुडमध्ये तरुणाची विष पिऊन आत्महत्या
ठळक मुद्देमेमो मिळाल्याच्या नैराश्यातून प्रकार केल्याचा संशय