शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

व्हाॅट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 20:44 IST

व्हाॅट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे.

धनकवडी : पाच दिवसापुर्वी आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस व्हाॅट्स अ‍ॅपवर टाकून घरातून निघून गेलेल्या युवकाचा मृतदेह हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सापडला आहे. तानाजी विष्णू शितोळे (वय ३९, रा. सुखसागरनगर, कात्रज) हे मृताचे नाव असून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तानाजी हरवल्याची तक्रार देवूनही पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास शितोळे कुटुंबियांनी नकार दिला आहे.  तानाजी चा भाऊ रावसाहेब शिताळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तानाजी बेपत्ता असल्याची तक्रार ६ जून ला दाखल केली होती.तानाजी विष्णू शितोळे हे प्रशांत कळसकर यांच्या गाडीवर चालक म्हणून गेले १५ वर्षांपासून काम करीत होते. मात्र मागील दोन वर्षापासून कळकसर हे तानाजी शितोळे यांना पगार देत नव्हते. म्हणून त्यांच्यामध्ये वादविवाद होत होते. मयत तानाजी शिताळे यांनी यावरून कळसकर यांना मारहाण सुद्धा केली होती. याबाबत कळसकर यांनी शिताळे यांच्या विरोधात दिनांक ३ जून रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तसेच सात आठ लोकांना घेऊन शिताळे यांच्या घरी गेले होते. यामुळे घाबरून जाऊन शितोळे यांनी घर सोडून बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार एन.एम. शिंदे हे शिताळे यांच्या घरी तपास करण्यासाठी गेले असता मयत तानाजी शिताळे यांच्या मोबाईल वर संपर्क करून शिवीगाळ केली. यामुळे शिताळे हे घरी गेलेच नाही. त्यानंतर दिनांक ५ जून रोजी रात्री १२.३० ला व्हाॅट्सअ‍ॅपवर मी आत्महत्या करीत आहे आणि माझ्या आत्महत्येला प्रशांत कळसकर जबाबदार असतील असे स्टेटस ठेवले. या घटनेमुळे घाबरून जाऊन रावसाहेब शिताळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये ६ जून ला मिसींग ची तक्रार दाखल केली. मात्र दोन दिवस यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आणि दिनांक ७ जून ला रात्री ११.०० वाजता  शिताळे यांचा मृतदेह चांदणी चौकात मिळून आला. 

रावसाहेब शिताळे म्हणाले - माझा भाऊ तानाजी शिताळे यांच्या मृत्युला प्रशांत कळसकर , पोलीस एन.एम. शिंदे  जबाबदार आहेत. त्यांच्या विरुद्ध तक्रार देऊन कारवाई होत नाही. स्वारगेट तसेच पोलीस आयुक्त कार्यालय येथे  सुद्धा आम्ही गेलो होतो. माझ्या भावाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली नाही तर  मी माझ्या कुटुंबासह पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्महत्या करणार आहे असा इशारा रावसाहेब शिताळेे यांनी दिला आहे.

सोशल मीडियावर सजगतेने नजर ठेवणाऱ्या राज्याच्या सायबर विभागामुळे एका तरुणाला शनिवारी आत्महत्येपासून रोखण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांंचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या त्या तरुणाचा जीव वाचवला. मात्र आत्महत्या करीत असल्याचे हाँट्स अँप स्टेटस ठेवणारा युवक दोन दिवस झाले बेपत्ता आहे. अशी तक्रार दाखल करुन ही पोलीसांना त्या तरुणांचा जीव वाचवता आला नाही.

विष्णू ताम्हाणे,पोलिस निरिक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (गुन्हे) म्हणाले, तानाजी शितोळे यांनीच प्रशांत कळसकर यांना मारहाण केल्याच्या तीन तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होत्या. त्या पार्श्वभुमीवर हवालदार शिंदे तपासाचा भाग म्हणून शितोळे यांच्या घरी गेले होते. मात्र याबात शितोळे कुटुंबियांचा गैरसमझ झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याPuneपुणेPoliceपोलिस