शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऊरूळी कांचन येथे इमारतीवरुन पडून तरुणीचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 16:11 IST

वेडाच्या भरात राहत्या इमारतीवरुन पडल्यामुळे एक तरूणी जागीच मृत्यूमुखी पडली असल्याची घटना घडली आहे. 

लोणी काळभोर : ऊरूळी कांचन ( ता. हवेली ) येथे  वेडाच्या भरात राहत्या इमारती वरुन पडल्यामुळे एक तरूणी जागीच मृत्यूमुखी पडली असल्याची घटना घडली आहे.              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या दुर्घटनेत प्रियांका गोविंद जंगम ( वय २४, रा. एस के सेंटर, उरुळी कांचन, ता. हवेली ) मुलगी मृत्यूमुखी पडली आहे. या संदर्भात तिचे वडील गोविंद मल्लिकार्जून जंगम ( वय ५२ ) यांनी फिर्याद दिली आहे. जंगम यांचे उरुळी कांचनमध्ये आश्रम रोडवर बेन्टेक्सचे दुकान आहे. गेल्या सहा महिन्यापासून प्रियांका हिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिच्या वर उरुळी कांचन मधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ती घरच्यांना काहीही न सांगता चालत निघून जात असे. नातेवाईक तिला परत घरी घेऊन जात असत. आज ( १४ जून ) रोजी पहाटे पावणे सहा वाजता तिने वडिलांना झोपेतून उठवले. मी आश्रमामध्ये फिरायला जाते असे ती वडिलांना म्हणाली. आज तु फिरायला जाऊ नकोस, उद्या सकाळी आपण दोघे फिरायला जाऊ असे, यावेळी वडिलांनी तिला सांगितले. त्यानंतर फ्रेश होऊन गोविंद जंगम तिला पहायला आश्रमात गेले. त्यावेळी ती तेथे दिसला नाही. त्यावेळी त्यांना एका फोनवरुन प्रियांका राहत्या इमारतीवरुन पडल्याची माहिती मिळाली. ते तातडीने तेथे गेले असता प्रियांकाच्या डोक्याला मार लागलेला त्यांना दिसला.  तिच्या डोक्यातून रक्त येत होते. कुणीतरी डॉक्टरांना बोलावून आणले. तिला तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करत आहेत.    

 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसWomenमहिला