शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

देव तारी त्याला काेण मारी ; पुलावरुन पडूनही युवकाचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 21:47 IST

पाेलिसांच्या सतर्कतेमुळे पुलावरुन पडलेल्या युवकाचे प्राण वाचल्याची घटना वारजे भागात घडली आहे.

वारजे : वेळ रात्री दोनची मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे भागात एक युवक दोन पूलाच्या मधून खाली पडला असल्याची वर्दी नियंत्रण कक्षाला मिळते. त्यानुसार वारजे पोलिस ठाणे व वारजे वाहतूक विभागाचे पोलिस रात्री अडीचच्या सुमारास दोन्ही या भागात पाहणी करतात. त्यांना रात्री तीन च्या सुमारास नदीवरील पुलाच्या अलीकडे ओढ्यावरील पुलाजवळ दुचाकी दिसते. पण दोन्ही पूलाच्या मधून खाली पाहिले असता प्रचंड पाऊस त्यात अंधार, त्यामुळे बॅटरीची उजेड जाईल तिथ दगड गोटे, चिखल व झुडपेच दिसत होते. पोलिसांनी आवाज देऊन पाहिला पण कोणीतरी जखमी दुचाकीस्वारास दवाखान्यात नेले असेल या आशेवर त्यांनी रात्री शोध थांबविला.

भल्या पहाटे वारजे वाहतूक विभागाचे कर्मचारी डोंगरसिंह महाले, दिनेश सोनवणे तसेच पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रशांत भोपळे रमेश क्षीरसागर, बाळासाहेब शिरसाठ, राहुल मोरे आदींनी पुन्हा घटना स्थळी शोध घेतला. त्यावेळी ओढ्याचे पानी कमी झाले होते. पोलिसांनी आवाज दिल्यावर अपघातग्रस्त दुचाकी चालक रविराज वडणे (वय २४ रा. सिंहगड रस्ता)  यांनी पोलिसांना हात उंचावून आपण आतील बाजूस ब्लॉक वर पडल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलिसांनी प्रचंड अडचणीचा सामना करत चिखल माती, गवत, दगडी, झुडुपे, ओढ्यातील गाळ यातून मार्गक्रमण करत युवक पडलेला असलेला ठिकाण गाठले. डोक्याला व पायाला मार लागलेल्या अवस्थेत व चालताही येत नसल्याने त्यास खांद्यावर उचलून घेत परत महामार्गावर आणले व त्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. 

पोलिसांच्या या सतर्कतेने तसेच सदर युवकाने वाहन चालवताना डोक्याला हेलमेट लावले असल्याने  त्याचे प्राण वाचण्यास मदत झाली. सुमारे २५ फुट उंचीवरून पूलाच्या पायाच्या सीमेंट ब्लॉक वर पडूनही हा युवक आश्चर्य कारकरित्या वाचला आहे. वारजे विभागाचे वाहतूक कर्मचारी डोंगर सिंह महाले  म्हणाले, रात्री आम्ही दोन्ही पुलावर तसेच खालीही शोधण्याचा प्रयत्न केला. पण अंधार व प्रचंड पावसाने शोधकार्यांत अडचणी होत होत्या. त्यामुळे पहाटे उजाडल्यावर लगेच आम्ही घटनास्थळी गेलो. व त्यास शोधून वर आणले. त्यामुळे एखादयास वाचवण्याचे मोठे समाधान लाभले.     

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेPoliceपोलिसWarje Malwadiवारजे माळवाडी