शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 8:31 PM

खडकी येथील एका शेतामध्ये कांदा बराकीत भरण्याचे काम करत होते. काम झाल्यावर प्रचंड गरम व्हायला लागल्याने तो दुपारी एकच्या सुमारास शेतातील विहिरीत पोहायला गेला.

मंचर  : विहिरीत पोहण्यासाठी गेलेला एक तरुण आज बुडाला. ही घटना खडकी  (ता. आंबेगाव) येथे आज दुपारी एकच्या सुमारास घडली. शिवम बाळासाहेब बांगर (वय १९) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृतदेह एनडीआरएफ टीमने बाहेर काढला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मंगळवारी ( दि. २३)आज दुपारच्या सुमारास शिवम हा त्याचा मित्र उमेश बांगर याच्यासोबत खडकी येथील एका शेतामध्ये कांदा बराकीत भरण्याचे काम करत होते. काम झाल्यावर प्रचंड गरम व्हायला लागल्याने तो दुपारी एकच्या सुमारास शेतातील विहिरीत पोहायला गेला.  ही विहीर ५० ते ५२ फूट खोल असून पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे. उमेश बांगर याला चांगले पोहता येत नव्हते, त्यामुळे त्याने कंबरेला प्लॅस्टीकचे कॅन बांधले होते. प्लॅस्टीक कॅन बांधून पोहत असताना शिवम बांगर हा सुद्धा पोहू लागला. अचानक शिवम पाण्यामध्ये गटांगळ्या खावू लागला त्याने उमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणात शिवम पाण्यात बुडाला. सुदैवाने उमेशबांगर बालंबाल बचावला गेला. उमेश याने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले. बुडालेला तरुण शिवम बांगर याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्यात त्याचा थांगपत्ता लागला नाही. पाणी उपसण्यासाठी ३ पंप लावण्यात आले. शोध घेऊनही शिवमचा शोध लागला नव्हता. त्यामुळे अखेर  त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ टीमला बोलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रांत संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. 

टॅग्स :MancharमंचरDeathमृत्यूPoliceपोलिस