Youth commits suicide on birthday | वाढदिवसाच्या दिवशीच युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
वाढदिवसाच्या दिवशीच युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

राजगुरुनगर : वाढदिवसाच्या दिवशीच एका ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. सागर पंढरीनाथ टकले (रा. आझाद चौक, राजगुरुनगर ) असे आमहत्या करणाऱ्या युवकाचे नांव आहे. याबाबात मयत सागर यांच्या वडिलांचा मित्र लक्ष्मण मारुती टाकळकर (वय६१, रा. टाकळकरवाडी, ता. खेड ) यांनी खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  बुधवारी ( दि. ११ ) रोजी सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. सागर याने ( दि.१०)च्या रात्रीच्या सुमारास राहत्या घरात बेडरुमच्या लाकडी तुळईला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा आज (दि११ ) वाढदिवस होता. वाढदिवसांच्या दिवशी आत्महत्या केल्याने राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली आहे. सागर हा अविवाहित होता. त्याच्या पाठीमागे आई, वडील दोन विवाहित बहिणी आहेत. सागर याला प्राणीपक्षी पाळणे यांचा छंद होता.

Web Title: Youth commits suicide on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.