कोंढव्यात दगड डोक्यात घालून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 09:30 IST2019-06-26T09:27:58+5:302019-06-26T09:30:39+5:30

उसन्या पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

youth brutally killed in punes kondhwa | कोंढव्यात दगड डोक्यात घालून तरुणाचा खून

कोंढव्यात दगड डोक्यात घालून तरुणाचा खून

पुणे : उसन्या पैशाच्या कारणावरुन कोंढव्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. मध्यरात्री हा प्रकार घडला. खड्या उर्फ शाहरुख मनसुख हसन (वय १९) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील पारशी ग्राऊंडजवळील शिवनेरनगरमधील गल्ली नंबर ९ येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. 

शाहरुख याचे काही जणांबरोबर पैशाच्या देवाणघेवाणीवरुन वाद होते. शाहरुख लोकांकडून उधारी घ्यायचा त्यानंतर पैसे परत देण्यास टाळाटाळ करायचा. यापूर्वी त्याची काही जणांशी भांडणे झाली होती. याशिवाय मारामारीच्या तक्रारीही कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल होत्या. काल मध्यरात्री तीन चार जणांसोबत त्याचा वाद झाला. तेव्हा त्यांनी शाहरुखच्या डोक्यात दगड घातला आणि तीक्ष्ण हत्याराने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ते पळून गेले. ही घटना पाहणाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शाहरुखला रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: youth brutally killed in punes kondhwa

टॅग्स :Murderखून