पिंपरी : पहिले भाषण, उलट्या रेल्वेने प्रवास, विनाकारण पळापळ, मुंबई महामार्गावरून जात असल्याने मावळमधून निवडणूक लढवित असल्याचे सांगितल्याने अगोदरच ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची शनिवारी (30) भेट घेतल्याने पुन्हा पार्थ ट्रोल होऊ लागले आहेत.दापोडीतील विनियार्ड चर्चेमध्ये शनिवारी (30) सायंकाळी सातवाजता पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते.. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका माई काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते.
'तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात'ने पार्थ पवार ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:13 IST