Online Fraud: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना फटका बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 02:47 PM2021-11-18T14:47:47+5:302021-11-18T14:48:02+5:30

सायबर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ८१ हजार रुपये ट्रान्सफर करुन बँक खाते रिकामे केले.

The young woman shared the OTP and loss 2 lakh in pune | Online Fraud: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना फटका बसला

Online Fraud: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना फटका बसला

googlenewsNext

पुणे: सायबर पोलीस, बँका वारंवार आपला गोपनीय क्रमांक, (OTP) शेअर करु नका, असे सांगत असतात. मात्र, ऑनलाईन खरेदी करण्याच्या मोहात अडकलेल्या एका २३ वर्षाच्या तरुणीने या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम सायबर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ८१ हजार रुपये ट्रान्सफर करुन बँक खाते रिकामे केले. (Cyber Crime)

याप्रकरणी एनआयबीएम येथे राहणाऱ्या एका २३ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तरुणीने ३ महिन्यांपूर्वी एका संकेतस्थळावर ऑनलाईन बूट खरेदी करण्यासाठी ऑर्डर केली होती. मात्र, त्यांना ऑर्डरचा कन्फर्मेशन कोड आला नाही. त्यामुळे तरुणीने गुगल सर्च करुन त्यांच्या मोबाईलद्वारे संकेतस्थळाच्या कस्टमर केअर नंबर मिळवला. दुर्दैवाने हा नंबर सायबर चोरट्यांनी गुगलवर टाकलेला फेक नंबर होता. तिने त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्याने ओटीपी शेअर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ओटीपी शेअर केला. त्याचा वापर करुन सायबर चोरट्याने विविध व्यवहार करुन १ लाख ८१ हजार ६२ रुपयांची फसवणूक केली. तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता. चौकशीअंती सायबर पोलिसांनी तो अर्ज कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले पुढील तपास करत आहेत.

गुगल सर्च करताना घ्या काळजी

अनेकदा आपण एखाद्या उत्पादनाची माहिती घेत असताना किंवा चौकशी करताना गुगल सर्च करुन कस्टमर केअरचा नंबर मिळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा सायबर चोरट्यांनी नामांकित कंपन्यांची बनावट संकेतस्थळ तयार करुन त्यावर आपले कस्टमर केअर नंबर टाकलेले असतात. त्यावर संपर्क साधल्यावर हे चोरटे आपण कंपनीकडून बोलत असल्याचे दाखवून ग्राहकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या जाळ्यात खेचत असतात. अनेक जण त्यांनी सांगितलेल्या बाबींची शहानिशा न करता ते सांगतात, त्याप्रमाणे कृती करतात. त्यातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते. त्यामुळे गुगलवर सर्च करताना काळजी घ्यावी तसेच नागरिकांनी शहानिशा करुन ऑनलाईन व्यवहार करावेत. आपला गोपनीय क्रमांक व ओटीपी कोणालाही शेअर करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: The young woman shared the OTP and loss 2 lakh in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.