शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune | लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; NDA मधील कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 13:06 IST

पोलिसांना बाथरूममध्ये चिठ्ठी मिळाली...

पुणे : मुलांचा क्लास घेण्यासाठी घरी येणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रियंका यादव (२१, रा. उत्तमनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुरींदरसिंग (रा. एनडीए क्वॉर्टर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत तिचा भाऊ प्रशांतकुमार दिलीप यादव (२५, रा. मोरसा रेसिडेन्सी, उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या राहत्या घरी २५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण प्रियंका बीएमसीसी महाविद्यालयात एम.कॉम.चे शिक्षण घेत होती. ती एनडीएमध्ये दोन आर्मी अधिकाऱ्यांच्या मुलांचा घरी जाऊन एक वर्षापासून क्लास घेत होती. २५ मार्च रोजी ती सकाळी उठली. आईला जेवायला वाढ असे म्हणून साडेदहा वाजता अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने तिच्या आईने दरवाजा वाजविला, तरी तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडला असता तिने पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

पोलिसांना बाथरूममध्ये चिठ्ठी मिळाली. त्यात गुरींदरसिंग याच्याबरोबर ७ महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. परंतु काही दिवसानंतर त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिल्याने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिले होते. तिच्या मोबाइलचा पासवर्ड चिठ्ठीत दिला होता. त्यावरून मोबाइलमधील फोटो पाहिल्यावर याच गुरींदरसिंग याच्या मुलांना ती शिकवायला घरी जात असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक चवरे तपास करीत आहेत.

टॅग्स :nda puneएनडीए पुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarriageलग्नMolestationविनयभंग