लोणावळा जवळील कुणेगावच्या दरीत युवक पडला, शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:47 IST2019-04-08T19:47:04+5:302019-04-08T19:47:44+5:30
सुमारे तीनशे फुट खोल दरीत पडलेल्या नागरिकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

लोणावळा जवळील कुणेगावच्या दरीत युवक पडला, शोध सुरु
लोणावळा : कुणेगाव लोणावळा येथील चेडाबा मंदिराजवळील दरीत सुमारे तीनशे फुट खोल पडलेल्या नागरिकांचा शोध शिवदुर्ग मित्र अँडव्हेंचर टिमच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोमनाथ गणपत गायकवाड (रा. कांब्रे मावळ सध्या रा. कुणेगाव, लोणावळा) असे या दरीत पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती समजताच शिवदुर्ग टीमचे समीर जोशी, प्रविण ढोकळे हे दरीत उतरले असून ओंकार पडवळ, सनी कडु, विकास मावकर, अशोक उंबरे, अनिल आंद्रे,आणि सुनिल गायकवाड आदी सहकारी घटनास्थळावर रेस्कूच्या सर्व साहित्यासह दाखल झाले आहे.