मोबाईल फुटल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:50+5:302021-01-04T04:10:50+5:30

पुणे : मोबाईल फुटल्याच्या कारणावरून वडील व दोन मुलाने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्ठू मारून जबर जखमी केले. याप्रकरणी खडकी ...

Young man beaten for breaking mobile phone | मोबाईल फुटल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

मोबाईल फुटल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

Next

पुणे : मोबाईल फुटल्याच्या कारणावरून वडील व दोन मुलाने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्ठू मारून जबर जखमी केले.

याप्रकरणी खडकी पोलिसांनी रफिक शेख व त्यांची दोन मुले साकिब व सानू शेख (रा. मुळा रोड, खडकी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन धरमपाल यादव (वय ३०, रा. मुळा रोड, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. यादव यांच्याकडून १० दिवसांपूर्वी रफिक शेख यांचा मोबाईल फुटला होता. त्या कारणावरुन यादव यांना १ जानेवारी रोजी मारहाण केली गेली.

..............

दरवाजावाटे प्रवेश करून चोरी

पुणे : जांभुळवाडी येथील फर्निचरच्या वर्कशॉपवर असलेल्या कार्यालयात दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने १ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात लॅपटॉप, ३ मोबाईल, रोख रकमेचा समावेश आहे. चोरट्याने ऑफिसचा दरवाजा उघडला असताना सर्वांची नजर चुकवून आत प्रवेश केला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Young man beaten for breaking mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.