मॉडेलिंगचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

By विवेक भुसे | Published: June 29, 2023 03:53 PM2023-06-29T15:53:22+5:302023-06-29T15:54:40+5:30

तरुणीने सातत्याने संबंध ठेवण्यासाठी अॅट्रोसिटीची केस करण्याची धमकी दिली

Young girl raped by threatening to make her modeling photos go viral | मॉडेलिंगचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

मॉडेलिंगचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

googlenewsNext

पुणे : नाशिक येथे मॉडेलिंगसाठी काढलेले कपल फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची भिती दाखवून तरुणीला त्याने आपल्या वासनेचे शिकार बनविले. तिने सातत्याने आपल्याशी संबंध ठेवावेत, यासाठी अॅट्रोसिटीची केस करण्याची धमकी दिली. परंतु, या धमकीला न घाबरता तिने नकार दिला. तेव्हा त्याने ते फोटो वडिलांना पाठविले. या नराधमाला चंदननगरपोलिसांनी अटक केली आहे. करण अण्णा पगारे (वय २५, मुळ रा. सामनगाव, नाशिक, सध्या रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चंदननगरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि ओळखी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नाशिक येथे एका मॉडेलिंगसाठी त्यांचे कपल फोटो काढले होते. करण पगारे हा मुळचा नाशिकचा राहणारा आहे. त्यानंतर तो आता पुण्यात राहण्यास आला आहे. नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी काढलेले फोटो नातेवाईक, आईवडिल यांना तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन करण पगारे याने या तरुणीला वडगाव शेरी येथील स्टे इन लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही आपल्याबरोबर शरीर संबंध ठेवावेत, यासाठी त्याने तिच्या कुटुंबियांविरुद्ध अॅट्रोसिटीची केस करण्याची व कपल शुटचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. परंतु, फिर्यादी याने त्यास नकार दिला. तेव्हा त्याने हे फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. पोलिसांनी करण पगारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Web Title: Young girl raped by threatening to make her modeling photos go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.