शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवलं; चंद्रकांत पाटलांचे नाना पटोले यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 15:41 IST

आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही

पुणे: काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे असं विधान केलं होत. त्यावर पाटलांनी प्रत्युत्तर दिल आहे. तसेच  तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवलं असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

नाना पटोले यांना टोला लगावत पाटील म्हणाले, उद्धवजी आणि आमचं गुण्यागोविंदाने चाललं होतं. तुम्ही त्यांना फितवलं, पळवलं, उद्धवजींची शिवसेना रोज उठून गद्दारी केली म्हणत आहेत. तुम्ही २०१९ ला काय केले. तुम्ही गद्दारीच केली ना, राष्ट्रवादी म्हणत आहे. यांनी यांची माणसं पळवली. आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. घर कोणी कोणाची फोडली, गद्दारी कोणी केली, पाठीत खंजीर कोणी खुपसला. यावर वेगळी पत्रकार परिषद घेण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित पवारांचा एक प्रॉब्लेम 

अजित पवार मला काय म्हणतात मला घेणे नाही. लोक मात्र माझ्या बाबतीत, शांत आहे संयमी आहे, चांगले बोलतात. अंगावर धावून येत नाहीत, कामे करतात असे बोलतात ते महत्वाचे आहे. अजित पवारांचा एक प्रॉब्लेम आहे, स्वतः वर झालेला अन्याय त्यांना व्यक्त करता येत नाही. त्यामुळे ते सांकेतिक अशी काहीतरी बडबड करत राहतात.

आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही

 कसबा - चिंचवड पोटनिवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणले,  येत्या ६ फेब्रुवारीला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील.  कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे