शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

योगिता पाटील, अशोक बनसोडे, पांडुरंग पवार मानकरी; लोकमत काव्यऋतू स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:31 PM

प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आहे.

पुणे : प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आहे.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कोपरगाव येथील कवी अ‍ॅड. अशोक बनसोडे यांच्या ‘माती काळीच आहे अजून’ या कवितेला जाहीर झाला आहे. तृतीय क्रमांक पांडुरंगपवार यांच्या ‘एखादे राष्ट्र बेचिराख होताना’ या कवितेने पटकावलाआहे. त्याचबरोबर रोशनकुमार पिलेवान (पिंपळगाव) यांची ‘यातनांचे घोस’, डॉ. संजय कुलकर्णी (उद्गीर) यांची ‘आरक्षण’, प्रा. मीनल येवले यांची ‘बाई आणि माती’, चित्रा क्षीरसागर (ताळगाव, गोवा) यांची ‘आताशा पोरी’, उमेश घेवरीकर (शेवगाव) यांची ‘शिक्षणाची कविता’ या कवितांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.या सर्व विजेत्या प्रतिभावंत कवींच्या पाठीवर कौतुकाची व प्रोत्साहनाची थाप देण्यासाठी दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठयेथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने हा काव्यसोहळा रंगणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे व कवी अशोक नायगावकर. कवी संदीप खरे ववैभव जोशी यांची उपस्थिती असणार आहे. ‘काव्यऋतू’ या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातूनसुमारे २ हजाराहून अधिककवितांचा पाऊस या स्पर्धेसाठी पडलेला होता. गोव्यापासून, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा विविध भागांतून तळागाळातल्या खेड्यापाड्यांतून कवींनीआपल्या कविता ‘लोकमत’कडे पाठवल्या. विशेष म्हणजे या सर्व कविता आॅनलाइन मागवण्यातआल्या होत्या.मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा ‘लोकमत’ने नवोदीत कवींनाही अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठउपलब्ध करून देण्यासाठीआणि त्यांच्या काव्यप्रतिभेलामानाचा मुजरा करावा ही‘लोकमत’ या स्पर्धेमागचीभूमिका आहे.या कवितांमधून प्रतिभावंत कवींची निवड करण्यासाठी मान्यवर व अभ्यासू परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे,ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव, डॉ. नीलिमा गुंडी यांचा समावेश होता. उत्तमोत्तम अशा कवितांमधून निवड करीत त्यांनी या कवितांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उत्तेजनार्थ विजेत्यांना एक हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सुरुवातीच्या काही रांगा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.नामवंतांची रंगणार बहारदार मैफलरसिक पुणेकरांसाठी १३ नोव्हेंबरचा दिवस एक अनोखी काव्यपर्वणी घेऊन येणारा ठरणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामांकीत कवींना एका व्यासपीठावर आणून त्यांचे कविसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांच्यासह कवी संदीप खरे, वैभव जोशी, भरत दौंडकर, अंकुश आरेकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित, तुकाराम धांडे, कल्पना दुधाळ आदी गाजलेले कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत.कथा स्पर्धेचेही पारितोषिक वितरण'लोकमत'तर्फे दिवाळी उत्सव अंकासाठी जाहीर केलेल्या जिल्हास्तरीय कथा स्पर्धेत आरती श्रुंगारपुरे यांच्या 'चिऊचं घर मेणाचं' या कथेला पहिला क्रमांक मिळाला. रमेश पिंजारकर यांच्या 'दिव्यांग दर्शन' या कथेला दुसरा व सुवर्णा पवार यांच्या 'लाल रिबीन' या कथेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तेजनार्थ पुरस्कार विजय सातपुते, योगेश गोखले, शंतनू चिंचाळकर यांना प्राप्त झाला आहे. या सर्वांनाही याच समारंभात गौरवण्यात येणार आहे.‘काव्यकट्टा’ हा उपक्रम काही अपरिहार्य कारणामुळे तूर्त स्थगित केला असून नंतर स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

टॅग्स :Puneपुणे