"हो मी नक्की येईन..." पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन, शिवसेना मेळाव्याला येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 20:17 IST2022-07-12T20:17:10+5:302022-07-12T20:17:27+5:30

सर्व नव्या-जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणून ऑगस्टमध्ये मेळावा घेणार

Yes I will definitely come uddhav thackeray assures Shiv Sainiks in pune will come to Shiv Sena meet | "हो मी नक्की येईन..." पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन, शिवसेना मेळाव्याला येणार

"हो मी नक्की येईन..." पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन, शिवसेना मेळाव्याला येणार

पुणे : शहरातील शिवसेना भक्कम आहे, जे गेले ते गेले. त्यांच्यामुळे संघटनेत फार फरक पडणार नाही. आम्ही लवकरच मेळावा घेणार आहाेत, त्याला तुम्ही येणार का, असा प्रश्न पुण्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. त्यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नक्की येईन, असे आश्वासन दिले. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील निवडक शिवसैनिकांना घेऊन मोरे हे सोमवारी मुंबईत गेले होते. त्यावेळी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी त्यांना शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत विचारणा केली. दरम्यान, माजी नगरसेवक नाना भानगिरे, माजी शहरप्रमुख अजय भोसले, युवा सेनेचे प्रदेश सहसचिव किरण साळी यांनी शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.

पुण्यातील शिवसेनेचे संघटन जुने व निष्ठावानांचे आहे. जुन्या नेत्यांनी संघटनेची बांधणी केली आहे. त्यामुळे चार-दोन पदाधिकारी गेले याचा अर्थ शिवसेनेची शक्ती कमी झाली, असे होत नाही. आम्ही सर्व नव्या-जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणून ऑगस्टमध्ये मेळावा घेणार आहोत, अशी माहिती मोरे यांनी दिली. त्यादृष्टीने पुण्यातील शिवसैनिकांबरोबर संपर्क सुरू केला आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Yes I will definitely come uddhav thackeray assures Shiv Sainiks in pune will come to Shiv Sena meet