शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

येस, ‘आय लव्ह माय ब्रेस्ट’! स्तनांच्या कर्करोगाच्या नायनाटाचा उचलला विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:32 AM

स्त्रीच्या सौैंदर्याचे प्रतीक मानल्या जाणा-या सुडौैल स्तनांवर कर्करोगाने घाला घातला की, तिच्या संपूर्ण आयुष्यातच जणू उलथापालथ होते; मात्र ‘ती’ने या जीवघेण्या आजाराचा सामना करत आपल्यासारख्याच इतर महिलांना आशेचा किरण दाखवला आणि ‘आय लव्ह माय ब्रेस्ट’ ही जनजागृतीपर चळवळ उभी केली आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : स्त्रीच्या सौैंदर्याचे प्रतीक मानल्या जाणाºया सुडौैल स्तनांवर कर्करोगाने घाला घातला की, तिच्या संपूर्ण आयुष्यातच जणू उलथापालथ होते; मात्र ‘ती’ने या जीवघेण्या आजाराचा सामना करत आपल्यासारख्याच इतर महिलांना आशेचा किरण दाखवला आणि ‘आय लव्ह माय ब्रेस्ट’ ही जनजागृतीपर चळवळ उभी केली आहे. वाड्या-वस्तीपासून कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांपर्यंत आजाराची कारणे, लक्षणे, उपचारपद्धती आणि स्वत:वर सातत्याने प्रेम करण्याची ऊर्जा या उपक्रमातून दिली जात आहे. हा उपक्रम शाळांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी पुढील पावले उचलली आहेत. हा उपक्रम पुण्यापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर पोचवण्याच्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू आहेत.पेशाने चार्टर्ड अकाउन्टंट असलेल्या पूर्वा भटेवरा-गादिया यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये स्तनाला सुपारीएवढी गाठ असल्याचे लक्षात आले. लगेचच वैैद्यकीय चाचण्यांना सुरुवात झाली. रिपोर्ट येईपर्यंत दुसरी गाठ तयार झाली होती. स्तनांचा कर्करोग झाला असल्याचे तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले. रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, यातून स्वत:ला सावरून त्यांनी उमेदीने आणि हसत-खेळत उपचारांना सामोरे जायचे ठरवले. याच काळात इतर रुग्णांशी, त्यांच्या नातेवाइकांशी पूर्वा यांचा जवळून संबंध आला. कर्करोगाविषयी जनजागृती होत असतानाही या आजाराबद्दल समाजाची मानसिकता, रुग्णाचे खच्चीकरण याबाबी त्यांनी जवळून अनुभवल्या. आॅक्टोबर २०१६ पर्यंत पूर्वा यांच्यावर उपचार सुरू होते.स्तनांचा कर्करोग झालेल्या इतर महिलांना बळ मिळावे, या उद्देशाने सप्टेंबर २०१७ पासून ‘आय लव्ह माय ब्रेस्ट’ या उपक्रमास सुरुवात केल्याची माहिती पूर्वा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्या म्हणाल्या, ‘या उपक्रमांतर्गत समाजाच्या सर्व स्तरांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आम्ही स्त्रियांना स्तनांच्या स्वयंपरीक्षणाबाबत मार्गदर्शन करत आहोत. घरच्या घरी हे परीक्षण केल्यावर संशय आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून उपचारांना सुरुवात करता येते. समाजात कर्करोगाविषयी असलेली भीती, गैैरसमज, उपचारपद्धतीबाबत असलेल्या चुकीच्या संकल्पना आणि कर्करोग्रस्त व्यक्तीविषयीचा दृष्टिकोन बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे.’रुबी हॉल क्लिनिक आणि नाग फाउंडेशनच्या डॉक्टरांची या उपक्रमासाठी मदत होत आहे. डॉ. रेबेका आणि डॉ. रिया यांचे या उपक्रमाला पाठबळ मिळाले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीही या चळवळीत सहभागी झाली आहे. सुरुवातीला या उपक्रमामध्ये २०-२५ महिला सहभागी झाल्या. ही संख्या १०० हून अधिक वाढवून ग्रुप वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी पूर्वा भटेवरा-गादिया यांच्या ग्रुपने १८ नोव्हेंबरपासून विविध ग्रुप्समध्ये जाऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत चार सेशन घेण्यात आले आहेत.आतापर्यंत पाच हजारांहून अधिक स्त्रियांनी या चळवळीचा लाभ घेतला आहे. आता पाच लाख स्त्रियांपर्यंत पोहोचायचे आहे. स्त्रियांच्या मनात असलेली भीती काढून टाकून कर्करोग म्हणजे मृत्यू हे समीकरण बदलायचे आहे. आजाराच्या नावाला, परिणामांना घाबरून न जाता त्याचा सामना करण्याची ताकद स्त्रियांमध्ये निर्माण व्हायला हवी.- पूर्वा भटेवरा-गादिया

टॅग्स :Puneपुणे