पुण्यात येरवड्यामध्ये डंपरच्या धडकेत युवती ठार, शास्त्रीनगर चौकात झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:09 IST2017-10-14T11:06:16+5:302017-10-14T11:09:17+5:30
येरवड्यात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अँक्टिव्हावरील युवतीला डंपरने दिलेल्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाला.

पुण्यात येरवड्यामध्ये डंपरच्या धडकेत युवती ठार, शास्त्रीनगर चौकात झाला अपघात
विमाननगर - येरवड्यात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अँक्टिव्हावरील युवतीला डंपरने दिलेल्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाला. येरवडा पोलिस स्टेशन समोरील शास्रीनगर चौकात हा अपघात झाला.
भाग्यश्री नायर (वय २५,उज्वल गार्डन,वडगांवशेरी)हिचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी डंपरचालक सागर नवनाथ चौगुले(वय ३०,रा वाघोली,मूळ गाव पंढरपुर)याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून येरवडा पोलिस स्टेशन येथे डंपरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.