शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:21 IST

पर्णकुटी पायथ्याजवळ सयाजीनाथ महाराज विसर्जन घाटासमोर ही घटना घडली

विमाननगर -पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून सशस्त्र हल्लेखोरांनी दोन तरुणांवर केलेल्या गंभीर हल्ल्यात येरवड्यात एकाचा खून झाला. निहाल जनार्दन लोंढे (वय१९ राहणार लक्ष्मीनगर येरवडा) याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र राहुल सतीश कांबळे (वय २३,राहणार लक्ष्मीनगर येरवडा )हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी पायथ्याजवळ सयाजीनाथ महाराज विसर्जन घाटासमोर ही घटना घडली. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले.येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी पायथ्याजवळ एका तरुणाला तलवारीने मारहाण करत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. घटनास्थळी येरवडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ गेले असता एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तेथे पडलेला दिसला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निहाल जनार्दन लोंढे असे त्याचे नाव असून तो त्याच्या मित्रांसमवेत पर्णकुटी पायथा येथून चालला असताना अज्ञात हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याने त्यांच्यावर वार केले.निहालच्या डोक्यावर तसेच कानावर वार करण्यात आले होते, तर त्याचा मित्र राहुल कांबळेच्या पोटावर व हातावर वार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू येरवडा  विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे करीत आहेत .

टॅग्स :PuneपुणेMurderखूनDeathमृत्यूCrimeगुन्हा