येरवड्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 10:39 IST2018-04-18T10:39:41+5:302018-04-18T10:39:41+5:30

येरवडा येथील कॉमर्स झोनच्या मैदानावर मंगळवारी रात्री एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Yerawada youth stoned to death | येरवड्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

येरवड्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

पुणे : येरवडा येथील कॉमर्स झोनच्या मैदानावर मंगळवारी रात्री एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नितीन कडाळे (वय २५, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
नितीन व त्याचे मित्र काल रात्री बाहेर गेले होते. त्यानंतर नितीनची काहीही माहिती त्यांच्या घरच्यांना मिळाली नाही. आज सकाळी कॉमर्स झोन समोरील मैदानावर एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने येरवडा पोलीस, गुन्हे शाखा तसेच न्यायवैद्यक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. साकोरे यांनी सांगितले की, मृत तरुणाची ओळख पटली असून त्यांच्या घरच्यांना याची माहिती देण्यात आली आहे. नितीन याचा भाऊ पोलीस ठाण्यात आला असून त्याच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्यातील आरोपीही निष्पन्न झाले असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल.

Web Title: Yerawada youth stoned to death