शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

यमराजने मला सांगितले होते त्याला मारायला; ‘त्या’ अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा

By नितीश गोवंडे | Updated: January 26, 2025 09:59 IST

वरून मला आदेश आला होता, स्वतः यमराजाने सांगितले होते की

पुणे : कॅम्प परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळून आला होता. डोक्यात गंभीर जखम असल्यामुळे खुनाचा प्रकार असल्याचे समजून बंडगार्डन पोलिस तपास करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली असून, त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस चौकशीदरम्यान, त्या व्यक्तीने सांगितले की, “वरून मला आदेश आला होता, स्वतः यमराजाने सांगितले होते की, त्या व्यक्तीची वेळ आली आहे, त्याला मारून टाक.” आरोपीच्या बोलण्यावरून तो पोलिसांना मनोरुग्ण वाटला. डॉक्टरांसमोर त्याला हजर केले असता डॉक्टरांनीदेखील तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले. त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरातील नेहरू मेमोरियल हॉलसमोरील फुटपाथवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता. त्याच्या अंगावर, डोक्यात जखमा होत्या. याबाबत नागरिकाने पोलिसांना माहिती दिली होती. ६० वर्षीय व्यक्तीच्या खूनप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. कॅमेऱ्यात तो एका अनोळखी व्यक्तीला मारहाण करीत असताना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड