शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

पुण्यातील चौकाचौकांत यमदूत उभा! ८५ होर्डिंग्ज अनधिकृत, ३४९ होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:30 PM

हडपसर, उरुळी देवाची आणि औंध या परिसरामध्ये ८५ अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचा दावा पुणे महापालिकेने केला आहे.....

पुणे : शहरात महापालिकेने परवानगी दिलेले अधिकृत २ हजार ५९८ होर्डिंग्ज आहेत. मात्र त्यामधील २ हजार २५९ होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्यात आले आहे. तर ३४९ होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. हडपसर, उरुळी देवाची आणि औंध या परिसरामध्ये ८५ अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचा दावा पुणे महापालिकेने केला आहे.

पुणे महापालिका हद्दीत मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात ५ ऑक्टोबर २०१८ रोजी लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून चार नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यानंतर पुणे महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईचा धडाका सुरू केला होता. खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात १ हजार ८०० अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले होते. गेल्या आठ महिन्यांत १ हजार ५६४ अनधिकृत होर्डिंग्जवर पुणे महापालिकेने कारवाई केली. उर्वरित अनधिकृत होर्डिंग व्यावसायिकांनी होर्डिंग नियमित करून घेतले.

उरुळी देवाची, फुरसुंगी आणि हडपसर या परिसरामध्ये ८४ आणि औंध परिसरामध्ये एक अशी एकूण ८५ अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. पुणे शहरात अधिकृत होर्डिंग्ज २ हजार ५९८ असून त्यापैकी २ हजार २५९ होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल पुणे महापालिकेकडे आला आहे. मात्र ३४९ होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. ज्या होर्डिंगचा स्ट्रक्चरल अहवाल आला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

आठ महिन्यात १ हजार ५६४ अनधिकृत होर्डिंग्ज हटविले

पुणे महापालिकेने र्सजगी संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात १ हजार ८०० अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले होते. गेल्या आठ महिन्यांत १ हजार ५६४ अनधिकृत होर्डिंग्जवर पुणे महापालिकेने कारवाई केली. उर्वरित अनधिकृत होर्डिंग व्यावसायिकांनी होर्डिंग नियमित करून घेतले.

नियमांकडे दुर्लक्ष

होर्डिंग उभारण्यासाठी शासनाची नियमावली कडक आहे. त्यामध्ये होर्डिंग कुठे लावावे, त्याचा वाहनचालकांना त्रास होऊ नये, परिसरातील रहिवाशांना लाईटचा त्रास होऊ नये, इमारतीमध्ये प्रकाश, हवा येण्यात अडथळा होईल असे गॅलरी, खिडक्या बंद होतील अशा ठिकाणी होर्डिंग लावू नये, असे नियम आहेत. साइड मार्जिनमध्ये होर्डिंग उभारताना पार्किंग, येण्या-जाण्याचा रस्ता बंद होऊ नये, असे नियम आहेत. पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. पालिका हद्दीत आकाशचिन्ह विभागाने परवानगी दिलेल्या बहुतांश होर्डिंग्ज त्यांना मान्य केलेल्या आकारापेक्षा अधिक आकाराच्या आहेत. उदाहरणार्थ २० फूट बाय ४० फूट ची परवानगी असताना ३० बाय ४० करणे, किंवा २० बाय २० ची परवानगी असताना ३० बाय ३० करणे इत्यादी प्रकार प्रत्यक्षात झालेले आहेत. ४० फूट पेक्षा अधिक उंचीवर होर्डिंग्ज उभारू नये, असा नियम असताना शेकडो होर्डिंग्ज ४० फुटापेक्षा अधिक उंचीवर आहेत. अनेक ठिकाणी अधिक आकारमान व उंची असलेले होर्डिंग्ज असून त्यावर पालिका कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्जने बसविलेले नियम धाब्यावर

पुणे महापालिका हद्दीत रेल्वेच्या जागेत ३० होर्डिंग्ज आहेत. अनेक ठिकाणी तीन ते चार होर्डिंग्ज एकत्र उभी केलेली आहेत. त्यामुळे या होर्डिंग्जवर वजनाचा अधिक भार पडतो. त्याने अनेकदा होर्डिंग्ज पडतात. याच प्रकारची घटना मंगळवार पेठेत अमर शेख चौकात झाली होती. याबाबत पालिकेने रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्र पाठविले आहे, असे पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

नगर रोड हद्दीत सर्वाधिक होर्डिंग्ज :

पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक म्हणजे ४९१ होर्डिंग्ज नगररोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. सर्वात कमी म्हणजे २६ होर्डिंग्ज भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ८९, ढोले पाटील ११४, औंध बाणेर ३७६, घौले रोड शिवाजीनगर २७८, कोथरूड बावधन १७०, वारजे कर्वेनगर १३२, सिंहगड रोड १४३, धनकवडी सहकारनगर ८२, हडपसर मुंढवा २६६, वानवडी रामटेकडी ७३, कोंढवा येवलेवाडी १०२, बिबवेवाडी ९६, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १६० होर्डिंग्ज आहेत. यामधील अनेक होर्डिंग्ज जुन्या इमारतीच्या बाजूच्या भिंती, गॅलरीवर लावलेल्या आहेत.

पुणे महापालिकेने होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली आहे. पण होर्डिंग्ज उभारताना ज्यांनी नियमावलीचे पालन केले नाही, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहे. शहरात ३४९ होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही, त्यांना नोटिसा देण्यात येणार आहे. हडपसर, उरुळी देवाची आणि औंध या परिसरामध्ये ८५ अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. त्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त , पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड