शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘बेदरकार ’वाहनचालकांवर गुन्ह्यांची ‘मात्रा’ ; तब्बल ९० गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 17:16 IST

पुणे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत सुसाट जाणारे वाहनचालक पाहायला मिळतात.

ठळक मुद्देया वाहनचालकांना एकूण ९० हजारांचा दंडसार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे. या गुन्ह्यासाठी होऊ शकते कडक शिक्षा

पुणे : एकीकडे शहरात वाहनचालकांमध्ये वेगाची नशा वाढत चाललेली असतानाच या बेदरकार वृत्तीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी गुन्ह्यांची मात्रा वापरण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलिसांनी चार महिन्यांमध्ये भादवि कलम २७९ आणि २८३ नुसार केलेल्या कारवायांमध्ये तब्बल ९० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे.पुणे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत सुसाट जाणारे वाहनचालक पाहायला मिळतात. उरात धडकी भरविणारा त्यांचा वेग पाहून सर्वसामान्यांना अक्षरश: धस्स होते. यासोबतच रस्त्यावर कुठेही वाहन उभे करण्याचे प्रकारही सर्रास सुरु आहेत. यामुळे अपघातांची शक्यता वाढते. या वाहनचालकांवर कारवाई करण्यामध्ये मनुष्यबळाअभावी वाहतूक पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. स्थानिक पोलिसांनाही याप्रकारे गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आहेत. मात्र, त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. पुणे महापालिकेच्या मैला वाहून नेणाऱ्या वाहनावर दत्तवाडी पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. नो एंट्रीमधून बेदरकारपणे गाडी चालवत अन्य लोकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी सज्जन विजय खाडे (रा. म्हसवड, ता. माण, सातारा) याच्याविरुद्ध कलम २७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या चार तासात आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये न्यायालयाने खाडेला १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली होती. ही घटना १७ सप्टेंबरला घडली होती. अशा प्रकारे आतापर्यंत दत्तवाडी पोलिसांनी विविध रस्त्यांवर कारवाई करीत ८० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. या वाहनचालकांना एकूण ९० हजारांचा दंड झालेला आहे. ====भादवि कलम २८३ प्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन पार्क केलेल्या सात वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने या वाहनचालकांनाही प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावलेली आहे. या सर्वांना ८ हजार ४०० रुपयांचा दंड झाला आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे ९१ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ३३ हजार ७०२ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.===वाहनचालकांनी बेदरकारपणे तसेच ओव्हरस्पीडने वाहन चालवू नये. नो एंट्री आणि विरुद्ध बाजुने येणे टाळावे. रस्त्यावरुन ज्येष्ठ नागरिक, महिला, गरोदर महिला, लहान मुले जात असतात. तसेच अन्य वाहनचालकांनाही तुमच्या चुकीमुळे प्राण गमवावा लागू शकतो, किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे स्वत:सोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नका. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. गुन्हा दाखल झाल्यास पुढे सर्वच गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. घाई न करता वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांची संख्या कमी होईल आणि वाहतूकीला शिस्तही लागेल.- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे..............कलम २७९मानवी जिवितास धोका, दुखापत, नुकसान होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे. या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. दोषी वाहनचालकास सहा महिन्यांपर्यंतची कैद, आर्थिक दंड अथवा दोन्ही अशा स्वरुपाची शिक्षा होऊ शकते. ....................कलम २८३सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन उभे करुन वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, अन्य प्रवाशांना धोका निर्माण करणे या कारणासाठी आर्थिक दंडाची तरतूद असून न्यायालयाद्वारे शिक्षाही होऊ शकते. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस