अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करत उठविला बदलीचा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 14:18 IST2018-05-29T14:18:35+5:302018-05-29T14:18:35+5:30
अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून बदलीत सूट मिळवल्याबद्दल शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करत उठविला बदलीचा फायदा
वाजेघर : वेल्हा तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून बदलीत सूट मिळवल्याबद्दल त्यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत वेल्हे पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी शिक्षण विस्ताराधिकारी सुनील मुगणे यांच्या विरोधात माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या संदर्भात गटविकास अधिकारी मनोज जाधव यांच्यासह गटशिक्षणाधिकारी यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. मुगणे यांनी सादर केलेले प्रमाणपत्र योग्य आहे कि अयोग्य आहे याची पडताळणी करण्यासाठी ते प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पाठविण्यात यावे व पडताळणी अहवाल येताच सनदशीर मार्गाने दोषींवर कार्यवाही करण्यात यावी असे तक्रार दाखल कर्त्यांची मागणी आहे.