शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अाराराSSS! 'मुळशी पॅटर्न'मध्ये गुंडांना नाचविले; दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 21:17 IST

लेखक- दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण करुन त्यांच्या पाैड राेडवरील अाॅफिसची ताेडफाेड केल्याचा प्रकार समाेर अाला अाहे.

पुणे : लेखक- दिग्दर्शक प्रविण तरडेंना त्यांच्या पाैड राेडवरील कार्यालयात अाज दुपारी अडीजच्या सुमारास मारहाण करण्यात अाली. त्यांचा बहुचर्चित मुळशी पॅटर्न हा सिनेमा लवकरच प्रदर्शित हाेणार असून या सिनेमातील अारारा या गाण्यामध्ये स्थानिक गुंड नाचताना दिसत असल्याने वाद निर्माण झाला हाेता.दरम्यान माराहाण नाहीतर काहीशी झटापट अाणि बाचाबाची झाली असून हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे प्रविण तरडे यांनी फेसबुकवर म्हंटले अाहे. 

    पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनी विकून झालेल्या विकासावर अाणि त्यातून निर्माण झालेल्या गुंडागर्दीवर मुळशी पॅटर्न सिनेमा तयार करण्यात अाला अाहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला अाहे. या सिनेमाच्या अारारा या गाण्यात स्थानिक गुंड नाचताना दिसत असल्याने वाद निर्माण झाला हाेता. अाज दुपारी अडीचच्या सुमारास तरडे यांच्या पाैड राेडवरील त्यांच्या कार्यालयात काही तरुणांनी गाेंधळ घातला. तसेच तरडे यांच्याशी त्यांनी धक्काबुक्की सुद्धा केली. याबाबत प्रविण तरडे यांनी अद्याप कुठलिही तक्रार पाेलिसात दाखल केलेली नाही. तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा सर्व प्रकार गैरसमजातून घडल्याचे म्हंटले अाहे. ज्यांनी धक्काबुक्की केली ते तरुण माझ्याच गावचे असल्याचे तरडे यांनी म्हंटले अाहे. चित्रपट पाहिल्यानंर त्यांचा गैरसमज दूर हाेईल. सिनेमा हा शेतकऱ्यांवर असल्याचे तरडे यांनी म्हंटले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPravin Tardeप्रवीण तरडेCrime Newsगुन्हेगारी