शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिन: फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी आता कायमस्वरूपी महिलांच्या खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 08:00 IST

सर्वात महत्त्वाचा व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक विभागात महिलांकडे

ठळक मुद्देफरासखाना वाहतूक विभाग महिला संचलितवाहतूक शाखेच्या पुणे पोलीस आयुक्तालयात २२ विभाग

पुणे : महिला दिनानिमित्त पुणे शहरातील वाहतूक शाखेचा फरासखाना वाहतूक विभाग महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत रविवारपासून संचलित करण्यात येणार आहे. ही योजना कायमस्वरुपी असणार आहे, अशी घोषणा वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केली आहे. वाहतूक शाखेच्या पुणे पोलीस आयुक्तालयात २२ विभाग आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक विभाग महिलांकडे सोपविण्यात आला आहे.याबाबत डॉ़ संजय शिंदे यांनी सांगितले, फरासखाना वाहतूक विभागाच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक स्वाती थोरात असणार असून त्यांच्याबरोबर सहायक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. म्हस्के, तसेच ३० महिला पोलीस कर्मचारी असणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीतील वाहतूकविषयक सर्व निर्णय व वाहतुकीचे नियोजन या महिला अतिशय सक्षमपणे पाहतील. हा निर्णय कायमस्वरुपी घेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वाती थोरात या सध्या वारजे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक, भरोसा सेल तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाचे काम यांनी यापूर्वी पाहिले आहे. त्यांची ६ जानेवारी २०२० रोजी वारजे वाहतूक विभागात बदली झाली होती. नव्या कामाविषयी स्वाती थोरात यांनी सांगितले, की सध्या वारजे वाहतूक विभागात काम पाहत आहे. तेथे पुरुष अधिकारी व कर्मचारी समवेत आहेत. मध्यवस्तीतील फरासखाना वाहतूक विभाग हा नेहमीच २४ तास वाहनांची वर्दळ असलेला विभाग आहे. तेथील काम आव्हानात्मक असते़ सर्व महिलांना बरोबर घेऊन येथे घडी बसवावी लागेल. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomen's Day Specialजागतिक महिला दिनtraffic policeवाहतूक पोलीस