शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक रंगभूमी दिन- मराठी रंगभूमीला राजकारणाचा तिटकाराच..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:30 IST

सूर्यास्त, आमदार सौभाग्यवती यासारखी हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी नाटके वगळता राजकीय नाटकांना मराठी रंगभूमीवर यश मिळाले नाही. 

- अविनाश थोरात- पुणे :  रंगभूमीवर सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असते असे म्हणतात. परंतु, जीवनाच्या सर्व क्षेत्राला व्यापून टाकणाऱ्या राजकारणाचा मराठी रंगभूमीला तिटकाराच असल्याचे दिसून आले आहे. सूर्यास्त, आमदार सौभाग्यवती यासारखी हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी नाटके वगळता राजकीय नाटकांना मराठी रंगभूमीवर यश मिळाले नाही. आणीबाणीचा संदर्भ असलेले सूर्यास्त हे जयवंत दळवी यांचे नाटक चांगलेच गाजले. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या आप्पाजी यांचा मुलगा संतराम हा मुख्यमंत्री होतो. नाटकाची सुरूवातच आणिबाणीच्या बातमीने  होते. संतराम आपल्या वडीलांचा आणीबाणीला पाठिंंबा आहे, असे खोटे पत्रक प्रसिध्द करतो. आणिबाणीच्या काळातील जुलूम, अन्याय आणि याच काळात राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण याचे चित्रण नाटकात आहे. संतरामच्या मध्यमवर्गीय सुनेचा या सगळया वातावरणात कोंडमारा होतो. यातून मध्यमवर्गीय समाज राजकारणापासून कसा दूर होत गेला हे देखील मांडले आहे. झोपड्या उठवून होणारे टॉवर आणि त्याल विरोध करणारे आप्पाजी यांचा खिडकीतून ढकलून संतराम खून करतो. येथे राजकारणाचे अध:पतन पूर्ण होते. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी आप्पाजी आणि लालन सारंग यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.  जयवंत दळवी यांचेच ह्यमी राष्टÑपतीह्ण या नाटकात राजकारणातील पैशाच्या वापराचे चित्रण आहे. एक उद्योगपती पैशाच्या जोरावर राष्ट्रपती बनण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हे नाटक प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. विजय तेंडूलकर यांची अनेक नाटके क्रांतीकारी ठरली.  घाशीराम कोतवाल हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरले. मात्र, या नाटकाला अभ्यासक थेट राजकीय म्हणत नाहीत. मात्र, तेंडूलकर यांनी प्रतिकात्मकतेचा वापर करून थेट राजकीय भाष्य केलेल्या नाटकांना यश मिळाले नाही.  दंबद्वीपाचा मुकाबला या नाटकात आणीबाणीचाच आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेचा वापर केला आहे. राजाच्या निधनानंतर राजनकन्या असलेल्या विजयराजे या अल्लड मुलीचा कठोर राजकारणी म्हणून झालेला प्रवास  चित्रीत केला आहे. देशातील अनेक घटनांचे संदर्भ या नाटकामध्ये येतात. मात्र, यातील प्रतिकात्मकता समजण्याइतका मराठी प्रेक्षक प्रगल्भ नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. प्रेक्षकांनी हे नाटक स्वीकारले नाही.  तेंडूलकर यांचेच  कन्यादान नाटक प्रथमदर्शनी राजकीय वाटले तरी त्याचा संदर्भ सामाजिक आहे. नाथा देवळालीकर नावाच्या समाजवादी नेत्याची मुलगी ज्योती  दलीत कार्यकर्ता अरुणच्या प्रेमात पडते. देवळालीकरही आपल्या समाजवादी विचारसरणीला समाजापुढे दाखविण्यासाठी लग्नाला पाठिंबा देतात. मात्र, लग्नानंतर अरुण उच्चवर्गीय आहे म्हणून ज्योतीचा छळ करतो. वडिलांच्या तकलादू आदर्शवादाचा निषेध म्हणून ज्योती छळ सहन करत अरुणबरोबरच राहण्याचा निर्णय घेते. विजय तेंडूलकर यांचे एका मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर म्हणून सादरीकरणापूर्वीच गाजलेल नाटक ह्यभाऊ मुराररावह्ण. धूर्त आणि कुटील मुख्यमंत्र्यांमधील माणूस दाखविण्याचा प्रयत्न तेंडूलकरांनी या नाटकात केला होता. थिएटर अ‍ॅकॅडमीने हे नाटक रंगमंचावर आणले. नाना पाटेकर आणि प्रसिध्द सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांच्या भूमिका होत्या. मात्र, थेट राजकारणाशी संबंधित असूनही हे नाटक प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. 'नियतीच्या बैलाला' हे तेंडूलकरांचे पथनाट्याच्या अंगाने जाणारे नाटक. फॅण्टसीवजा कल्पनेतून त्यांनी राजकारणावर भाष्ट केले आहे. मध्यमगवगीर्यांचे चाकोरीबध्द जीवन आणि समाजसेवेची भाषा करणारे स्वार्थी, संधीसाधू पुढारी आहेत. या नाटकाने महाविद्यालयीन तरुणांना पथनाट्य सादर करण्यासाठी आकर्षिक केले. मात्र, रंगभूमीवर हे नाटक चालले नाही. महेश एलकुंचवार यांच्या पार्टी नाटकावर हिंदीमध्ये चित्रपट आला. यामध्ये कलाजगतातील दांभिकपणावर प्रहार असले तरी दिल्लीतील राजकारण, परदेशी शिष्टमंडळांमध्ये सहभागासाठी होणारे लॉबींग याबरोबरच नक्षलवादाचाही प्रश्न मांडला आहे. नक्षलवाद्याच्याच जीवनावर अनिल बर्वे यांचे थॅँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक खूपच गाजले. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुल येथील उठावातील नक्षलवादी विरभूषण पटनायक ग्लाड नावाच्या जेलरच्या तुरुंगात येतो. डॉक्टर असलेल्या विरभूषणचा ग्लाड छळ करतो. पण शेवटी ग्लाडच्या मुलीचे बाळंतपण करून विरभूषण तिचे प्राण वाचवितो. त्याला वीराप्रमाणे मरण द्यावे यासाठी ग्लाड त्याला गोळी घालतो. यावेळी विरभूषण थॅँक्यु, मिस्टर ग्लाड असे म्हणत प्राण सोडतो. नाट्य हेच असले तरी नक्षलवादाच्या समस्येवरील हे पहिलेच नाटक. विशेष म्हणजे चळवळीशी निष्ठावान सुशिक्षित नक्षलवाद्याचे चित्र त्यात आहे. यामधील एका प्रसंगात विरभूषण म्हणतो, शेतेच जळत आहेत तर गुलाबाच्या फुलांसाठी रडायला वेळ कोणाला आहे?प्रगल्भ राजकीय जाणीव असलेल्या गो. पू. देशपांडे यांच्या ह्यउध्वस्त धर्मशाळा या नाटकात  तत्वनिष्ठ मार्क्सवादी नेत्याचे चित्रण केले आहे.  तत्व प्रणाली कितीही  कालबाह्य झाली अपयशी ठरली  ती स्वीकार करणाऱ्या पिढीचा जीवनपट मांडला अहे. डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या रुपवेध या संस्थेतर्फे हे नाटक रंगमंचावर आणले. व्यावसायिक यश मिळाले नाही तरी वैचारिक नाटकांमध्ये आजही त्याचे नाव घेतले जाते. गो. पूं. चेच एक वाजून गेले हे नाटकही डाव्या विचारसरणीचा राजकीय दृष्टीकोन मांडते. अंधार यात्रा या नाटकात गो. पुू. देशपांडे यांनी विद्यापीठीय राजकारण, विद्यार्थी चळवळ यांचा आढावा घेतला आहे. वि. वा. शिरवाडकर यांनीही आमचं नाव बाबुराव  हे राजकीय नाटक लिहिले होते. जयवंत दळवी लिखित पुरुष नाटकात गांधीवाद आहे. बदललेल्या राजकारणाचा प्रतिनिधी असलेला खलनायक आहे. परंतु, ऐवढ्यापुरतेच राजकारण आहे. पुरुषसत्ताक समाज हा त्याचा विषय आहे. राजकारणातील महिला आरक्षणाच्या अगोदर स्त्री-पुरुष सत्तासंघर्षाचा आढावा घेणारे रा. रं. बोराडे यांचे आमदार सौभाग्यवती या नाटकाने रंगमंचावर प्रचंड यश मिळविले. पत्नी आमदार झाल्यावर स्वत: निर्णय घेऊ लागते. यामुळे पती आणि तिचा मुलगाही विरोधात जातो. पूर्णपणे व्यावसायिक असूनही या नाटकाने महिला आरक्षणाच्या चळवळीतही ठसा उमटविला. चैतन्य सरदेशपांडे लिखित माकड या नाटकाने तत्कालिन राजकारणात मध्यमगवर्गाची झालेली कोंडी मांडली आहे.  आपल्याला काय फरक पडणार आहे या भूमिकेने मतदानादिवशी लोणावळ्याला फिरायला निघालेल्या एका जोडप्याला सरकारी यंत्रणा हवालदाराकरवी जबरदस्तीने मतदान करायला भाग पाडतात.  याचे कारण म्हणजे सरकारला ६० टक्के मतदारांनी निवडून देऊन शंभर टक्के जनतेवर राज्य करणं मंजूर नसल्याने मतदानाचा टक्का वाढवायचा  असतो.  सरकार निवडून येतं ते थेट जनतेच्या घरात घुसून त्यांच्यावर पाच दिवस राज्य करायचं ठरवतं. जनतेनं काय करावं, काय करू नये, काय खावं, काय प्यावं, किती आणि कधी मुलं जन्माला घालावीत, या सगळ्याचे निर्णय हे सरकारच घेतं. विकास करायचा असल्यानं ही जोरजबरदस्ती अनिवार्य ठरते. या दांपत्याला मुल नको असलं तरी सरकार त्यांना हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी दोन दिवसांत मूल जन्माला घालायचा आदेश देते. पतीला  ते शक्य न झाल्याने सरकार पत्नीवर बलात्कार करते.  नाटकातून सरकारने वर्तमान संदर्भ आणले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणTheatreनाटक