शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

World Kidney Day : पुणे विभागात तब्बल १ हजार ६७२ जण वेटिंगवर, ५ वर्षांत केवळ २४७ जणांना मिळाली किडनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 10:19 IST

पुणे विभागात सध्या १६७२ रुग्ण किडनीसाठी वेटिंगवर आहेत. गेल्या पाच वर्षांत केवळ २४७ जणांवर किडनी प्रत्यारोपण केले आहे....

पुणे : मधुमेहाचे वाढलेले प्रमाण, बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्यात झालेले बदल आदी कारणांमुळे किडनी (मूत्रपिंड) निकामी हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यापेक्षाही विदारक म्हणजे मृत्यू झाल्यानंतर अवयवदान न केल्याने अनेकांना किडनी मिळत नसल्याचे दिसते. परिणामी पुणे विभागात सध्या १६७२ रुग्ण किडनीसाठी वेटिंगवर आहेत. गेल्या पाच वर्षांत केवळ २४७ जणांवर किडनी प्रत्यारोपण केले आहे.

किडनीबाबत जनजागृती करण्यासाठी मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार हा जागतिक किडनी दिन म्हणून पाळण्यात येताे. मूत्रपिंड किंवा किडनी ही आपल्या शरीरातील टाकावू पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकून देणारे एक विशेष फिल्टर प्रणाली आहे. रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे त्याचबराेबर रक्तातील सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे घटक क्षार आणि खनिजे यांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

आपल्या शरीरात पाेटात दाेन्ही बाजूंला दाेन किडनी असतात. खरे तर एकच किडनी पुरेशी असते; मात्र दुसरी किडनी ही दाेन्हींपैकी एखादी खराब झाल्यास बॅकअप म्हणून काम करीत असते. जेव्हा या दाेन्ही किडनी खराब हाेतात किंवा त्या काम करणे थांबवतात तेव्हा त्या रुग्णाला दिवसाआड डायलिसिस म्हणजे कृत्रिम मशीनद्वारे रक्त शुद्धीकरण करावे लागते. ही बाब त्या रुग्णाच्या वैयक्तिक जीवनात त्रासदायक ठरते. त्यावर एकच उपाय आहे ताे म्हणजे किडनी प्रत्यारोपण.

सध्या मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे. त्यामुळे किडनी प्रत्याराेपणाद्वारे एखाद्याला पूर्ववत चांगले जीवन मिळू शकते; मात्र त्याबाबत असणारे गैरसमज, जनजागृतीचा अभाव, पैशांची कमतरता आदी कारणांमुळे किडनी प्रत्यारोपण हाेत नाही. हे प्रमाण वाढायला हवे. आपल्याकडे ब्रेनडेड झालेल्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात आहे; मात्र अनेक घटकांकडून सहकार्य हाेत नसल्याने त्या रुग्णांचे अवयव दान हाेत नाहीत.

पुणे विभागात गेल्या पाच वर्षांत केवळ २४७ जणांवर ब्रेनडेड व्यक्तींद्वारे किडनी प्रत्यारोपण केले आहे. तर सध्या १६७२ रुग्ण किडनीसाठी वेटिंगवर आहेत. अवयवदान वाढायला हवे.

- आरती गाेखले, समन्वयक, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड