शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून कर्मचारी ढाराढूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:19 IST

वैकुंठ स्मशानभूमीतील प्रकार : राख सावडायला गेलेल्या नातेवाईकाना संताप अनावर..

ठळक मुद्देकामगार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणासोबतच अमानवी भावनांना कोण आवर घालणार वैकुंठामध्ये ठेकेदाराने एकूण 13 जणांना (ऑपरेटर) तीन पाळ्यांमध्ये कामाची जबाबदारी दिलेलीअन्य शेडमध्ये अंत्यविधी झालेल्या मृतदेहांच्या बाबतही थोड्या फार प्रमाणात असाच प्रकार

पुणे : पावसाचे कारण देत खोलीमध्ये डाराडूर झोपलेल्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच राहिला. संताप आणणारी ही घटना पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये घडली. बुधवारी सकाळी सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नातेवाईकांना ही गोष्ट निदर्शनास आल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. याप्रकरणी प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. नितीन शंकर चव्हाण (रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर) या तरुणाचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी अडीचच्या दरम्यान अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधी लागणारे लाकूड तसेच अन्य साहित्य, पुरेसे रॉकेलही नातेवाईकांनी येथील कर्मचाऱ्यांकडे सोपविले होते. पुरेशी लाकडे देऊनही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत कसा राहिला असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित करीत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. परंतू, कर्मचारी व सुपरवायझर यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. पालिकेने वैकुंठ स्मशानभूमीमध्ये प्रदुषणमुक्त अंत्यविधीकरिता धूर शोषून घेणाऱ्या चिमण्या बसविल्या आहेत. त्याचा ठेका मुंबईच्या  ‘निकीता बॉयलर’ या ठेकेदाराला देण्यात आले आहे. वैकुंठामध्ये ठेकेदाराने एकूण 13 जणांना (ऑपरेटर) तीन पाळ्यांमध्ये कामाची जबाबदारी दिलेली आहे. सकाळी सहा, दुपारी चार तर रात्रीच्यावेळी तीन जणांची ड्युटी लावली जाते. मंगळवारी दुपारी नितीन चव्हाण यांच्यावर अंत्यविधी झाला. रात्री दहा वाजता शिफ्ट संपल्याने दुपारच्या ऑपरेटरने रात्रीच्या ऑपरेटरकडे कामाची सूत्रे दिली. रात्रीच्या ऑपरेटरने मृतदेहाच्या पाय आणि डोक्याजवळील लाकडे काढून ती होळीला रचतात त्याप्रमाणे मृतदेहाच्या शिल्लक राहिलेल्या भागाभोवती रचली. मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस पडत असल्याने शेडमध्ये थांबणे अवघड झाल्याने हा ऑपरेटर खोलीमध्ये जाऊन बसला. दरम्यान, रात्री अन्य शेडमध्ये अंत्यविधी झालेल्या मृतदेहांच्या बाबतही थोड्या फार प्रमाणात असाच प्रकार घडला. खोलीमध्ये जाऊन बसलेला हा कर्मचारी थेट सकाळीच बाहेर आला. सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नातेवाईकांना अर्धवट जळालेले मृतदेहाचे गोळे दिसल्याने संताप अनावर झाला. त्यांनी कर्मचारी तसेच ठेकेदाराच्या सुपरवायझरकडे संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी जळालेल्या भागाच्या अस्थी घेऊन सावडण्याचा कार्यक्रम कसाबसा पार पाडला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जास्तीची लाकडे लावून उरलेला मृतदेहाचा भाग जाळण्याची व्यवस्था केली.========वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एकूण चार शेड असून त्यामध्ये चार ते पाच मृतदेह जाळण्याची व्यवस्था आहे.  ठेकेदाराकडून प्रत्येक शेडसाठी तीन शिफ्टमध्ये कामगार नेमण्यात आलेले आहेत. मृतदेहावर अंत्यविधी झाल्यानंतर हा मृतदेह व्यवस्थित जळतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांची आहे. लाकडे कमी पडत असतील अथवा अन्य काही अडचण असल्यास नातेवाईकांना फोन करुन माहिती देणे या कामगारांना बंधनकारक आहे. तसेच सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर रक्षा उचलणे, स्वच्छता करणे ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी आहे. परंतू, ऑपरेटरने चव्हाण यांच्या मृतदेहाबाबत कोणतीही माहिती नातेवाईकांना कळविली नाही. ====हा एकंदर प्रकार चिड आणणारा आणि असंवेदनशील आहे. माझ्या भावाच्या मृतदेहाबाबत हा प्रकार घडला. परंतू, दुर्लक्ष केल्यास आणखी कोणासोबतही हा प्रकार घडू शकतो. ठेकेदार, कामगार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणासोबतच अमानवी भावनांना कोण आवर घालणार असा प्रश्न आहे. दोषींवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. - सतीश चव्हाण, पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर====दुपारच्या ऑपरेटरनेही मृतदेह व्यवस्थित जळतो आहे की नाही हे पाहिले होते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, दुपारी अडीचच्या सुमारास अंत्यविधी झाल्यानंतर रात्री दहापर्यंत मृतदेह पूर्णपणे जळणे अपेक्षित होते. परंतू, दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत अग्नी राहूनही मृतदेह अर्धवटच जळालेल्या अवस्थेत कसा राहिला असा प्रश्न आहे. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका