Pimpri Chinchwad: धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना
By प्रकाश गायकर | Updated: January 11, 2024 19:39 IST2024-01-11T19:38:54+5:302024-01-11T19:39:16+5:30
ही घटना मंगळवारी (दि. ९) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली...

Pimpri Chinchwad: धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना
पिंपरी : टेम्पोच्या पाठीमागे माल पकडून थांबलेला कामगार धावत्या टेम्पोतून रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.
विनोद कुमार आसुदोमल (वय ५१, रा. पिंपरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ओम विनोद कुमार चंदानी (२१, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक सचिन शाहूराव भिंताडे (रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भिंताडे हा टेम्पो चालवतो. तर मयत विनोद हे टेम्पोवर काम करत होते. सचिन याने विनोद यांना टेम्पोच्या पाठीमागे माल पकडून उभा राहण्यास सांगितले. त्यानंतर सचिन याने निष्काळजीपणाने टेम्पो चालवला. त्यावेळी विनोद हे धावत्या टेम्पोतून रस्त्यावर पडले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.