शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

दिवसा काम करायचं अन् रात्रशाळेत शिक्षण पूर्ण करायचं; जिद्द, मेहनतीच्या जोरावर बारावीत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:20 IST

प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, समर्पण भाव आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वाटेत कितीही संकटे आली तरी माणूस पुढे जाऊ शकताे

पुणे : शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा हाेती, पण आर्थिक परिस्थिती साथ देत नव्हती. माझे वडील कपड्यांच्या दुकानात, तर आई कंपनीत कामाला जाते. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून घर चालविणे म्हणजे माेठे आव्हान. त्यामुळे आई-वडिलांना आर्थिक हातभार लागावा म्हणून मीदेखील काम करू लागले. शिक्षण तर साेडायचं नव्हत, पण काम केल्याशिवाय दुसरा पर्यायदेखील नव्हता. त्यामुळे दिवसा काम करायचे आणि रात्रशाळेत प्रवेश घेऊन शिक्षणही पूर्ण करायचे, असा निश्चय केला. त्यानुसार मी माझा दिनक्रम ठरवला आणि काहीही झाले तरी त्यात बदल करायचे नाही, असे स्वत:लाच बजावून सांगितले. शिकण्याची जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि आई-वडिलांसह शिक्षकांची साथ मिळाली आणि बारावीत चांगल्या गुणाने उत्तीर्ण हाेऊ शकले, हे बाेल आहेत सरस्वती संस्थेच्या पुना नाइट हायस्कूल प्रथम आलेल्या मैथली धाडवे हिचे.

प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, समर्पण भाव आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वाटेत कितीही संकटे आली तरी माणूस पुढे जाऊ शकताे. दिवसा कष्टाची कामे करून पाेटापाण्याची तजवीज करायची आणि रात्री सरस्वती संस्थेच्या पुना नाइट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात धडे गिरवत अपूर्ण राहिलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करायचे. पावला-पावलावर अनेक संकट उभे राहिले तरी मागे हटायचे नाही, हाच संदेश मैथली धाडवे (७३.१७ टक्के) हिच्यासह रोशन डिके (७२.८३ टक्के), देवकन्या घरबुडवे (७१.२३ टक्के) यांनी पहिल्या तीनमध्ये येत दिला आहे.

नाेकरी आणि शिक्षणासाठी पुण्यासह बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी पुण्यात येतात. यातील अनेकजण दिवसा कारखाने, बांधकाम साइट, हॉटेल, दुकानांत मिळेल ते काम करून चार पैसे गाठीशी बांधून ठेवतात आणि रात्री शाळेत जाऊन अभ्यास करत असतात. यापैकीच एक म्हणजे मैथली धाडवे. तिने वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली आणि ७३.१७ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात अव्वल स्थान पटकावले. मैथली ही दिवसा कॉल सेंटरमध्ये काम करते. त्याचा कितीही ताण आला तरी न थकता तीने रात्री अभ्यासासाठी वेळ काढला. या कष्टाची पावती तिला बारावीच्या निकालातून मिळाली आहे. बारावी परीक्षेत मिळालेल्या चांगल्या गुणांमुळे अभ्यासाला आणखी बळ मिळाले आहे. याबद्दल मी खूप आनंदी असून, मला पुढे वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण करायचे आहे, असे मैथलीने सांगितले.

याचबराेबर महाविद्यालयात दुसरा आलेला रोशन डिके हा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवडे गावचा. ग्रामीण भागातून ताे पुण्यात आलेला. नाेकरी करण्याबराेबरच शिक्षण अपूर्ण राहता कामा नये म्हणून पुना नाइट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेला. कर्वेनगर येथील एका मिसळ हाऊसमध्ये दिवसभर काम करून रात्रीचा अभ्यास करत त्याने बारावीत ७२.८३ टक्के मिळविले.

देवकन्या घरबुडवे-वाघमारे हिने ६८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तिने वयाच्या ३८व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली आणि चांगले गुणदेखील मिळवले. या आधी दहावींमध्येही प्रथम क्रमांक मिळविला होता. विधीचा अभ्यासक्रम पूर्ण करून वकील होण्याचा मानस तिने व्यक्त केला. दैनंदिन संघर्ष आणि अडथळ्यांवर मात करत या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे.

राेजगारासाठी शहरात आलेले अनेक विद्यार्थी दिवसा कष्ट करून रात्री शिक्षण घेण्यासाठी रात्रशाळेत प्रवेश घेतात. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. यामध्ये वयाची अट नाही. त्यामुळे रात्रशाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे हॉटेल, कंपनीत, दुकानात काम करून शिक्षण घेतात. यंदा शाळेचा निकाल ७१.२३ टक्के लागला आहे. - सतीश वाघमारे, प्राचार्य

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकालHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणWomenमहिलाcollegeमहाविद्यालय