शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अबब...! पुणे महापालिकेने बांधली ६२ हजारांची एक पायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 20:46 IST

लहान मुलांना खेळण्यासाठी जाता यावे तसेच नदीपात्रामध्ये स्वच्छता करता यावी करिता पालिकेच्यावतीने डी. पी. रस्त्यावरील शाहू वसाहतमध्ये १४ पायऱ्या बांधण्यात आल्या...

ठळक मुद्देडीपी रस्त्याचे रुंदीकरण झाले असून याठिकाणी मुलांना खेळायला जागा नाही शिल्लक पालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाकडून घाट बांधण्याचे काम सुरु क्षेत्रिय कार्यालयाकडून ९ लाख ९७ हजार ८७० रुपये कामाची निविदा

पुणे : लहान मुलांना खेळण्यासाठी जाता यावे तसेच नदीपात्रामध्ये स्वच्छता करता यावी करिता पालिकेच्यावतीने डी. पी. रस्त्यावरील शाहू वसाहतमध्ये १४ पायऱ्या बांधण्यात आल्या असून यासाठी सव्वा नऊ लाखांची निविदा काढण्यात आली होती. पालिकेला एक पायरी तब्बल ६२ हजारांना पडली असून याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. म्हात्रे पुलाकडून राजाराम पुलाच्या दिशेने जाताना ज्ञानदा शाळेसमोर रस्त्याच्या डाव्या हाताला शाहू वसाहत आहे. या वसाहतीमध्ये निमुळ बोळा असून येथील डीपी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. मुलांना खेळायला जागा नाही. येथील मुले नदीपात्रामध्ये खेळायला जातात. वस्ती आणि नदीच्यामध्ये संरक्षक भिंत आहे. सिमाभिंतीलगत नदीपात्राच्या दिशेने तीव्र उतार आहे. तसेच या पात्रामध्ये दलदल आणि झाडेझुडपे उगवलेली आहेत. याठिकाणी पालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाकडून घाट बांधण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून ९ लाख ९७ हजार ८७० रुपयांचे पुर्वगणन पत्रक तयार करुन या कामाची निविदा काढण्यात आली. निविदा पॉईंट ९९ टक्के (.९९%) कमी दराने आलेल्या निविदेनुसार के. के. कंपनीला कार्यादेश (वर्क आॅर्डर) देण्यात आली. हे काम तीन महिन्याच्या मुदतीत करायचे असून त्याला सुरुवातही झाली आहे. याठिकाणची तीन झाडेही कापण्यात आली आहेत. साधारण १५ फूट लांब जागेत तीन ते चार फूट रुंदीच्या १४ पायºया बांधण्यात आल्या आहेत. ====डीपी रस्त्याचे रुंदीकरण झाले असून याठिकाणी मुलांना खेळायला जागा शिल्लक नाही. या मुलांना नदीपात्रात खेळता यावे तसेच नदीपात्राची स्वच्छता करता येईल याकरिता नदीपात्रात उतरण्यासाठी घाट बांधून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यानुसार २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात १० लाख रुपयांची तरतूद केली होती. निविदा काढूनच हे काम केले जात आहे. हे काम करत असताना एकही झाड तोडण्यात आलेले नाही. जेवढे काम होईल, तेवढेच बील अदा केले जाणार आहे. - जयंत भावे, स्थानिक नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका