शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘कसं जायचं शौचाला?’ : महिलांचा सवाल; स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:52 PM

मोडलेले दरवाजे... दरवाजाला कडीच नाही... स्वच्छतागृहाची व्यवस्था बरी, तर त्यात पाणी व लाईटची सोय नाही... ही स्थिती आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यातील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची.

ठळक मुद्देसर्वेक्षणामध्ये ११३ पैकी ८७ स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सोयच नसल्याचे आले समोरपुरेशा संख्येने महिलांना स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत म्हणून ‘राईट टू पी’ मोहीम : वर्षा गुप्ते 

पुणे : मोडलेले दरवाजे... दरवाजाला कडीच नाही... स्वच्छतागृहाची व्यवस्था बरी, तर त्यात पाणी व लाईटची सोय नाही... ही स्थिती आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यातील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची. यामुळे विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांवर ‘तुम्हीच सांगा, कसं जायचं शौचाला?’ म्हणण्याची वेळ आली आहे. अभिव्यक्ती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये ११३ पैकी ८७ स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सोयच नसल्याचे समोर आले आहे. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहाची संख्याच खूप कमी अन् अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था व दुर्गंधी यामुळे सर्वांजनिक स्वच्छतागृहाचा वापर करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.महिलांसाठी मोफत, स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, प्रत्येक दोन किलोमीटरवर स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून द्यावी, त्यात पुरेसे पाणी, वीज, स्वच्छता, कचऱ्याच्या डब्याची सोय, सुरक्षित स्थितीतील दरवाजे आदी सुविधा असाव्यात अशा हक्काच्या मागण्यासाठी शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नोकरदार महिला आणि नागरिकांनी गुरुवारी महापालिकेच्या समोर आंदोलन केले. यामध्ये अभिव्यक्ती, सोशालिस्ट महिला सभा, लोकायत, सोशालिस्ट पार्टी (इंडिया) आदी संस्था सहभागी झाल्या होत्या. या वेळी अभिव्यक्तीच्या अलका जोशी यांनी सांगितले, की पुण्यामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठेमोठे उड्डाणपूल उभे केले जात आहेत, मेट्रो आणली जात आहे; परंतु अत्यावश्यक गरजेच्या गोष्टींसाठी खर्च करण्यास महापालिकेकडे निधी नाही. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहराच्या अंदाजपत्रकात महिला स्वच्छतागृहांसाठी पुरेशी तरतूदच नसणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहाअभावी लघवी रोखून धरावी लागते. परिणामी मूतखडा, बद्धकोष्ठता, अर्धशिशी अशा अनेक आजारांना त्या बळी पडतात. या वेळी अनिता नाकाडे व सायली स. प्र. उपस्थित होत्या.

महिलांसाठी तुटपुंज्या संख्येने असलेली स्वच्छतागृहे ही मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असून, तेथे पाणी, विजेची सोय नाही, दरवाजे-कड्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे अशा स्वच्छतागृहांचा वापर करताना महिलांना असुरक्षित वाटते. या पार्श्वभूमीवर, महिलांसाठी पुरेशा संख्येने महिलांना स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत म्हणून ‘राईट टू पी’ मोहीम राबविण्यात येत आहे. - वर्षा गुप्ते 

मोफत वाय-फाय अशा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना महिलांच्या नैसर्गिक विधीसाठी आवश्यक स्वच्छतागृहांची उभारणी केली जात नाही.  - शकुंतला भालेराव 

टॅग्स :Puneपुणे