शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

महिलाशक्तीचा थरार!, वैष्णवी मांडेकर व अस्मिता जोशी यांनी घडविला जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 5:46 AM

चांदे (ता. मुळशी) येथील वैष्णवी दादाराम मांडेकर आणि पुण्यातील अस्मिता जोशी या दोघी कराटेपटूंनी सहा इंची खिळ्यावर झोपून छातीवर एक हजार किलो वजनाच्या फरश्या फोडण्याचा नवा जागतिक विक्रम रचला आहे. अवघ्या ५.२४ मिनिटांत सर्व फरशा फोडण्याचा महिलाशक्तीचा हा थरार पुण्याच्या कॅम्प येथील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये उपस्थितांनी अनुभवला.

पौड  -  चांदे (ता. मुळशी) येथील वैष्णवी दादाराम मांडेकर आणि पुण्यातील अस्मिता जोशी या दोघी कराटेपटूंनी सहा इंची खिळ्यावर झोपून छातीवर एक हजार किलो वजनाच्या फरश्या फोडण्याचा नवा जागतिक विक्रम रचला आहे. अवघ्या ५.२४ मिनिटांत सर्व फरशा फोडण्याचा महिलाशक्तीचा हा थरार पुण्याच्या कॅम्प येथील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये उपस्थितांनी अनुभवला. कराटे आणि बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मैदाने गाजविणाºया वैष्णवीने मुळशीचा झेंडा जगात फडकविला आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे.शालेय वयापासूनच वैष्णवीला या खेळाची आवड होती. आतापर्यंत तिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मैदानेही गाजवून प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली. दोघींनीही या खेळात जागतिक विक्रम करण्याचा मानस सहा महिन्यांपासून आखला होता.तीन वर्षांपूर्वी महिला दिनाच्या दिवशी याच असोसिएशनच्या ऋतुजा दळवी, प्रार्थना कोठी, तन्वी शेठ, जागृती कोठकर या चौघींनीसहा इंची खिळ्यावर झोपून प्रत्येकी एक हजार किलोच्या फरश्या फोडण्याचा जागतिक विक्रम केला होता. त्याची गिनीज आणि लिम्का बुकमध्ये नोंद झाली. त्यापुढे एक पाऊल टाकीत नवीन विक्रम करण्यासाठी दोघींची मेहनत चालू होती.गुरुवारी (८ मार्च) दोघींचाही जागतिक विक्रम पाहण्यासाठी पुणे आणि मुळशीकरांची गर्दी झाली होती.साठ किलो वजनाची सहा इंची खिळ्याच्या फळीवर वैष्णवी पाठीवर झोपली. तिच्या पोटावर साठ किलो वजनाची सहा इंची खिळ्याची दुसरी फळी ठेवली. त्यावर अस्मिता पाठीवर झोपली.तिच्या अंगावर एक हजार किलोच्या फरश्या ठेवून प्रशिक्षक विक्रम मराठे यांनी ५ मिनिटे २४ सेकंदांत एक हजार फरशा फोडल्या. उपस्थित टाळ्यांचा गजर करीत दोघींचे धाडस वाढवीत होत्या. पाच मिनिटांच्या या काळात सर्वांचेच श्वास रोखले गेले होते. खिळ्याच्या फळीवर एकमेकीच्या अंगावर झोपून फरशा फोडण्याचे धाडस जगात यापूर्वी कुणा पुरुषानेही केले नव्हते. ते धाडस वैष्णवी आणि अस्मिताने करून अबला या सबला आहेत हे दुनियेला दाखवून दिले.

टॅग्स :PuneपुणेWomen's Day 2018महिला दिन २०१८