शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चोरट्यांकडून महिला टारगेट , पर्स चोरीच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:00 IST

गेल्या काही दिवसांपासून कर्वेनगर, कोथरूड भागात महिलांकडील पर्स, दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

ठळक मुद्देमहिन्याभरात चोरट्यांनी पर्स हिसकावण्याचे चार गुन्हे

पुणे : शहरात महिलांकडील पर्स हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. नळस्टॉप चौकानजीक दुचाकीस्वार नृत्यदिग्दर्शक युवतीची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी पहाटे घडली. पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोकड, एटीएम कार्ड, वाहन परवाना असा २५ हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी मंजू विश्वनाथ वाघमारे (वय २६, रा. शिवाजीनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंजू वाघमारे नृत्यदिग्दर्शिका आहेत. या कार्यक्रमासाठी त्या बाहेर गेल्या होत्या. रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास दुचाकीस्वार मंजू नळस्टॉप चौकातून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी अमृतेश्वर हॉटेलसमोर दुचाकीस्वार मंजू यांची पर्स हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. पोलिसांकडून चोरटयांचा माग काढण्यात येत आहे. नळस्टॉप चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्वेनगर, कोथरूड भागात महिलांकडील पर्स, दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. महिन्याभरात चोरट्यांनी पर्स हिसकावण्याचे चार गुन्हे केले आहेत. जंगली महाराज रस्त्यावर परगावाहून आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. पर्समध्ये ८० हजारांची रोकड होती. मात्र, अद्याप चोरट्यांना पकडण्यात आले नाही. पर्स हिसकावण्याचे गुन्हे चोरट्यांनी पहाटे केले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीCrimeगुन्हाPoliceपोलिस