शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पती आणि पतीच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावर बदनामी; शिक्षिकेने गळफास घेत संपवलं जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 21:09 IST

गेल्या तीन वर्षांपासून पती व त्याची मैत्रिण या दोघांनी दिपाली यांना त्रास देण्यास सुरुवात करत तिच्या नावाने फेसबुकवर 'फेक' खाते उघडले.

पुणे : पती व पतीच्या मैत्रिणीकडून सतत होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून खासगी शाळेत काम करणार्‍या शिक्षिका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपाली नितीन गायकवाड (वय ३३, रा. लक्ष्मीनगर येरवडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नितीन वसंत गायकवाड (वय ३६) व त्याची मैत्रीण या दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विवाहितेचे वडील मारुती यशवंत चव्हाण (वय ६२, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे.  ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे २०१८ ते १८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली व नितीन यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या एका खासगी शाळेत नोकरी करत होत्या, तर पती हा ठेकदारीची कामे करतो. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पती व त्याची मैत्रिण या दोघांनी दिपाली यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच तिच्या नावाने फेसबुकवर 'फेक' खाते उघडले. त्याद्वारे दिपाली यांच्या नातेवाईक व मैत्रिणी यांना अश्लील व घाणेरड्या कमेंट केल्या व त्यांची बदनामी केली. तर, तू मरुन जा, तुला कुठेच आम्ही दोघे जगू देणार नाही, तू स्वत:हून जीव देशील, असे बोलून संशय घेत शिवीगाळ करून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून दिपाली यांनी राहत्या घरात सप्टेंबर २०२० मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दिपाली यांच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. पण, ते कोरोनामुळे परत आले नाहीत. नुकतेच त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला