तब्बल ४८ ग्रामपंचायतींचा कारभार हाकणार महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:37+5:302021-02-05T05:08:37+5:30
पौड : मुळशी तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यावेळी मुळशीतील नागरिकांनी कासार आंबोली येथील सैनिकी ...

तब्बल ४८ ग्रामपंचायतींचा कारभार हाकणार महिला
पौड : मुळशी तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यावेळी मुळशीतील नागरिकांनी कासार आंबोली येथील सैनिकी शाळेत मोठी गर्दी केली होती. गावकारभाऱ्यांचे आरक्षण जाहीर झाल्याने काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम पाहायला मिळाला.
यावेळी उपजिल्हाधिकारी राणी तोते, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जमाती -
कुभेरी, संभवे.
अनुसूचित जमाती स्त्री-
कोळावडे, ताम्हिणी.
अनुसूचित जाती -
चांदे, काशिग - शिंदेवाडी, भादस बु - गावडेवाडी, उरवडे, दखणे.
अनुसुचित जाती स्त्री - भांबर्डे (घुटके, आडगाव, तैलबैल, एकोले) वातुंडे, जांबे, चांदिवली, कासारसाई, पिरंगुट- मुकाईवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग -
जातेडे, भालगुडी, रिहे, मारुंजी, सुस, बावधन बु, नेरे, चाले, कातरखडक, कोंढूर, भरे, पाथरशेत, भूगाव.
नागारिकांचा मागास प्रवर्ग स्त्री -
म्हाळुंगे, मुगावडे, कोळवण, घोटावडे, डावजे, तव, निवे, पिंपळोली, माण, दारवली, साठेसाई, लव्हार्डे, मुगाव.
सर्वसाधारण- मुळशी खुर्द, पौड, वारक, रावडे, हिंजवडी, शेरे, मुठा, कुळे, माले, वाळेण, खेचरे, लवळे, वांद्रे, आंदेशे, चिखलगाव, बार्पे, आंदगाव, वडगाव, कासारआंबोली, पोमगाव, जामगाव, भोयणी, वांजळे, नाणेगाव, टेमघर, भोडे, मुलखेड.
सर्वसाधारण स्त्री
खांबोली, धामणओहोळ, दासवे, माळेगाव, वेगरे, चिंचवड, आडमाळ, मारणेवाडी, मांदेडे, नांदगाव, हाडशी, आंबेगाव, खारावडे, भुकूम, आसदे, बेलावडे, वळणे, बोतरवाडी, नांदे, खुबवली, कोंढावळे, आंबवणे, अकोले, मोसे खुर्द, शेडाणी, अंबडवेट, जवळगाव.
२९ पौड
कासार आंबोली येथे सरपंच आरक्षण सोडत प्रसंगी नागरिकांनी केलेली गर्दी.