शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अपघातग्रस्त महिलेची पर्स लांबविणाऱ्या महिला पोलिसास तळेगाव दाभाडेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 2:36 PM

पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देतळेगाव दाभाडे पोलिसांनी केली महिला पोलिसास अटकस्वाती गुलाब जाधव असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव

पुणे : पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ तळेगाव दाभाडे पोलिसांनी या महिला पोलिसास अटक केली आहे़ स्वाती गुलाब जाधव असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे़याबाबतची माहिती अशी, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या समोर बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता दोन दुचाकीत अपघात झाला़ त्यात ही महिला व तिचे वडिल किरकोळ जखमी झाले होते़ महिला पोलीस स्वाती जाधव यांनी त्यांना रुग्णालयात नेले़ त्यानंतर त्यांच्याकडून चावी घेऊन त्यांची दुचाकी पोलीस ठाण्यात लावली़ सायंकाळी ही महिला आपली दुचाकी घेण्यास पोलीस ठाण्यात आली़ तिने चावी घेऊन डिकी उघडली़ तर त्यात ५० हजार रुपये असलेली पर्स गायब झाल्याचे दिसून आले़ पोलीस ठाण्याच्या आवारातील दुचाकीमधून पर्स चोरीला गेल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली़ तेव्हा ती पर्स स्वाती जाधव यांच्याकडे असल्याचे दिसून आले़ परंतु, रात्र झाली असल्याने शेवटी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन महिला पोलीस स्वाती जाधव यांना रात्री उशिरा अटक केली आहे़ तिच्याकडून पर्स हस्तगत करण्यात आली आहे.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड