पुणे जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांकडेच; नसबंदीला पुरूषांची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:42 PM2020-12-12T15:42:11+5:302020-12-12T16:00:54+5:30

मागील पाच वर्षांमध्ये १ लाख महिलांच्या तुलनेत केवळ ८६४ पुरूषाच्या नसबंदी शस्त्रक्रिया

Women are responsible for family planning In Pune district ; 'this' causes sterilization of men | पुणे जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांकडेच; नसबंदीला पुरूषांची टाळाटाळ

पुणे जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांकडेच; नसबंदीला पुरूषांची टाळाटाळ

Next

रविकिरण सासवडे- 
बारामती: स्त्री-पुरूष समानतेचा जागर आज सर्वत्र होत असला तरी ग्रामीण व शहरी भागातील कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर टाकली जात आहे. पुरुषी अहंकार व वेगवेगळ्या गैरसमजापोटी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात पाच वर्षात लाखभर महिलांच्या तुलनेत  केवळ ८६४ पुरुषांनी  नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत.

नुकताच जागतिक पुरूष नसबंदी सप्ताह पार पडला.शहरी व ग्रामीण भागात पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेबाबतची अनस्था असल्यामुळे याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे. लहान कुटूंब, सुखी कुटूंब ही संकल्पना मागील काही वर्षांमध्ये सर्वदूर पोहचली.यातुनतच कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेने गती पकडली. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजन उपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची विशेष तरतूद केली आहे. मागील पाच वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात आरोग्य केंद्र अंतर्गत  १ लाख २ हजार ६९८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये केवळ ८६४  पुरुषांनी नसबंदी केली आहे. तर यामध्ये १ लाख एक हजार ८३४ महिलांचा समावेश आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या अनुसुचित जाती जमाती व दारिद्य्र रेषेखालील महिलांना ६०० रुपये तर सर्वसाधारण महिलांना २५० रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवा यासाठी पुरूषांना १४०० रुपये अनुदान सरकारकडून दिले जात आहे. या अत्यंत सोप्या व गुंतागुत विरहीत शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी स्थानिक स्थरावर वैद्यकिय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका प्रयत्न करत आहेत.


पुणे जिल्ह्यात पाच वषार्तील नसबंदी दृष्टिक्षेपात
     वर्षे         पुरुष     महिला      एकूण
 २०१५-१६     १६५    २३७२१     २३८८६
 २०१६-१७     ३३१    २२६११      २२९४२
 २०१७-१८      ८४      १८७१२    १८७९६
 २०१८-१९      १३३     १९१४९    १९२८२
 २०१९-२०      १५१     १७६४१    १७७९२

........

आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत सातत्याने जनजागृती

 स्रियांच्या कुटूंबनियोजन शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण फारच कमी आहे. पुरूषांमध्ये असणारे याबाबतचे गैरसमज आणि समाजाची मानसिकता याला कारणीभूत आहे. नसबंदी शस्त्रक्रिया केली म्हणून पुरूषांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.
- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी,पुणे जिल्हा परिषद

............

पुरूषप्रधान संस्कृती कारणीभूत... 

भारतीय समाजात असलेली पुरूषप्रधान संस्कृती याला कारणीभूत आहे. तसेच दबावापोटी किंवा इतर कारणांनी घरातील महिलाच कुटूंब नियोजनाची जबाबदारी स्वत:वर घेते. पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये जास्त गुंतागुंत नसते. अगदी शस्त्रेक्रियेनंतर सबंधित पुरूष दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपली दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणेच करू शकतात. मात्र याबाबत समाजाची असलेली मानसिकतेमुळे पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे.
- डॉ. सदानंद काळे, वैद्यकिय अधिक्षक, बारामती उपजिल्हा रूग्णालय
------------------------

Web Title: Women are responsible for family planning In Pune district ; 'this' causes sterilization of men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.