महिलेचा मृत्यू; चौघांना अटक
By Admin | Updated: January 12, 2017 03:09 IST2017-01-12T03:09:01+5:302017-01-12T03:09:01+5:30
सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी आलेल्या महिलेला कोणतीही सुरक्षासाधने न पुरविता निष्काळजीपणा

महिलेचा मृत्यू; चौघांना अटक
पुणे : सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी आलेल्या महिलेला कोणतीही सुरक्षासाधने न पुरविता निष्काळजीपणा दाखविल्याने १९ व्या मजल्यावरून पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे़
पर्चेस एक्झिक्युटिव्ह संदीप दिलीप पाटील (वय ३२, रा़ रास्ता पेठ), सुपरवायझर शिरीष घिमनलाल गुजराती (वय ५५, रा़ कोथरूड), हर्षल विनायक म्हेत्रे (वय ३६, रा़ आंबेगाव बुद्रुक) आणि रूपेश राम केसेकर (वय ३२, रा़ गुरुवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत़ सहायक फौजदार बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना पौड फाट्याजवळील निर्वाण हिल्स या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडला़ या घटनेत अनुश्री आशुतोष पांडे (वय ५०, रा़ बावधन) यांचा मृत्यू झाला होता़ (प्रतिनिधी)