शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यांकडून महिलेला मारहाण

By admin | Updated: January 28, 2015 02:29 IST

विरोधात तक्रार दिल्याचा राग धरून येथील अंगणवाडी कार्यकर्तीला दारूविक्रेत्यांनी बेदम मारहाण केली. या महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बारामती/माळेगाव : विरोधात तक्रार दिल्याचा राग धरून येथील अंगणवाडी कार्यकर्तीला दारूविक्रेत्यांनी बेदम मारहाण केली. या महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माळेगाव (ता. बारामती) येथे प्रजासत्ताक दिनीच हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पद्मिनी ऊर्फ पद्मा शहाजी गव्हाणे, मुलगा अमोल शहाजी गव्हाणे आणि पती शहाजी भगवान गव्हाणे (रा. तिघेही माळेगाव बुद्रक, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २६) पीडित अंगणवाडी कार्यकर्ती महिला ग्रामपंचायतीमधून खाऊ घेऊन अंगणवाडीकडे निघाल्या होत्या. याच वेळी पद्मा गव्हाणे ही महिला त्यांच्या दिशेने चालत आली. त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. याच वेळी अचानक पद्मा हिने पीडित महिलेच्या डोक्यावर खराटा मारला. तसेच, गव्हाणे हिचा मुलगा अमोल गव्हाणे, पती शहाजी गव्हाणे हे दोघे घरातून पळत आले. त्यांनी लाथ मारून त्यांना दुचाकीसह खाली पाडले. तसेच, लाकडी दंडुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांची साडीदेखील ओढून विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. मारहाण करून धमकी देण्याचा प्रकार सुरूच होता. हा प्रकार सुरू असताना परिसरातील महिला धावत आल्या. त्यांनी मारहाणीचा जाब विचारला. तसेच, आरोपींच्या ताब्यातून पीडित महिलेला सोडविण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेच्या सहकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता भुजबळ या तेथे आल्यानंतर तिघेही घरात पळून गेले. त्यांनी घराचे दार बंद करून घेतले. भुजबळ आणि ग्रामस्थांच्या मदतीने पीडित महिलेने माळेगाव दूरक्षेत्रात जाऊन या प्रकाराची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. प्रजासत्ताक दिनीची अवैध दारूविक्रेत्यांनी सकाळी ७.१५ ते ७.३० दरम्यान भररस्त्यात उच्छाद मांडला. पोलिसांनी विनयभंग, रस्त्यात अडवून मारहाण करणे आदी प्रकरणी त्या तिघांवर कारवाई केली.मारहाण प्रकरणातील तिसरा आरोपी अमोल गव्हाणे याला न्हावरे (ता. शिरूर) येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलीस कर्मचारी रमेश नागटिळक, संदीपान माळी यांनी छापा टाकून गणेशला त्याच्या नातेवाइकाच्या घरातून ताब्यात घेतले.(वार्ताहर)