पुणे: लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर तिला आवडत्या खाद्यपदार्थांमधून गर्भपाताचे औषध दिले आणि तिचा गर्भपात केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
विनय सुनील खिल्लारे उर्फ मोनू (वय ३२) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात एका ३८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडितेस खिल्लारे याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला आवडणाऱ्या खाद्यपदार्थांमधून गर्भपाताचे औषध दिले आणि तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने खडकी पोलिस ठाण्यात खिल्लारे याच्याविरोधात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक सरोदे अधिक तपास करत आहेत.
लग्न न करता फसवणूक
एका महिलेला सुरुवातीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली. गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला आवडणाऱ्या खाद्यपदार्थांमधून गर्भपाताचे औषध दिले आणि तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केली