Pune: महिला, तरुणाच्या हाताला हिसका मारुन मोबाईल चोरी; शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

By नम्रता फडणीस | Updated: March 4, 2024 16:30 IST2024-03-04T16:26:53+5:302024-03-04T16:30:02+5:30

पर्वती भागात एकाच दिवशी महिलेसह दोघांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत चोरटे पसार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत...

Woman snatches youth's hand and steals mobile phone; Increase in mobile phone theft incidents in the city | Pune: महिला, तरुणाच्या हाताला हिसका मारुन मोबाईल चोरी; शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Pune: महिला, तरुणाच्या हाताला हिसका मारुन मोबाईल चोरी; शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बंडगार्डन व पर्वती भागात एकाच दिवशी महिलेसह दोघांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत चोरटे पसार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

बंडगार्डन भागात ए.आय.एस.एस.एस कॉलेज समोर रविवारी ( दि. ३) दुपारी पावणेचार वाजता ३९ वर्षीय महिला रिक्षाने कचरेवाडी ते कोरेगाव पार्क कडे जात असताना दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी रोहन प्रेम लोहार व महेश मोहन कुंवर (वय १९) यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्वती येथील तावरे कॉलनी परिसरात मोबाईल चोरीची रविवारी ( दि. ३) दुसरी घटना घडली. फिर्यादी योगेश नंदकुमार आरु ( वय २७, गणेशनगर धायरी) हे मित्राबरोबर उसाचा रस पिण्यासाठी जात असताना हातवारे कॉलनी येथे आले असता समोरून दुचाकीवरून येणा-या तीन जणांनी फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. याप्रकरणी तिघांवर पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman snatches youth's hand and steals mobile phone; Increase in mobile phone theft incidents in the city