Pune: मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल

By नम्रता फडणीस | Published: October 10, 2023 03:18 PM2023-10-10T15:18:17+5:302023-10-10T15:19:19+5:30

याप्रकरणी तीन जणांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Woman outing with friend molested; A case has been registered against the three | Pune: मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Pune: मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करुन मैत्रिणीला अश्लील शिवीगाळ करण्याबरोबरच भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. ही घटना खराडी येथील शॉन हॉलजवळ रविवारी (दि. 8) रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी तीन जणांवर चंदननगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात तीन आरोपींविरुद्ध भादवि 354, 509,506 आणि 324, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सीआरपीसी 41 (1) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणीसमवेत जेवण करुन फिरण्यासाठी गेल्या असता आरोपी यांनी वेगात गाडी चालवून कट मारला असता फिर्यादी यांनी नीट गाडी चालविता येत नाही का? असे विचारले. तेव्हा आरोपीने फिर्यादी यांचा हात जोरात ओढून त्यांचा दंडावरची गाऊनची बाही फाटली. तसेच त्यांच्या मैत्रिणीचे केस ओढून अश्लील शिवीगाळ केली. त्यांच्या मदतीला आलेल्या व्यक्तीला मारहाण करुन धमकी दिल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस  उपनिरीक्षक मुळूक करीत आहेत.

Web Title: Woman outing with friend molested; A case has been registered against the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.