पापळवाडीला महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:48+5:302021-01-13T04:26:48+5:30
अशोक एकनाथ शिंदे (रा. पापळवाडी, ता खेड) असे आरोपीचे नांव आहे. रविवारी (दि पापळवाडी येथे लग्नाची वरात होती. ...

पापळवाडीला महिलेचा विनयभंग
अशोक एकनाथ शिंदे (रा. पापळवाडी, ता खेड) असे आरोपीचे नांव आहे. रविवारी (दि पापळवाडी येथे लग्नाची वरात होती. पिडित महिलेचा लहान मुलगा वरात पाहण्यासाठी गेला होता. रात्र झाली म्हणून पिडित महिला लहाण मुलाला घरी आणण्यासाठी गेली होती. दरम्यान अशोक शिंदे यांनी अंधाराचा फायदा घेऊन पिडित महिलेला एकटी गाठवून मला तु आवडते असे म्हणून तोंड दाबुन अंधारात हात धरून ओढले, पिडित महिला ओरडल्यामुळे महिलेचा पती घराबाहेर आला. पतीने पळत जाऊन शिंदे यांच्या हातातुन सोडविले. शिंदे यांनी पिडित महिलेचा पती यांना मारहाण करुन शिवीगाळ करून दमदाटी केली. दरम्यान इतर लोक जमा झाल्याने शिंदे अंधारात पळून गेला. या घटनेबाबत पिडित महिलेने खेड पोलिस ठाण्यात अशोक शिंदे यांच्या विरूद्ध फिर्याद दिली आहे.