Pune: नळावरील भांडणात पोटावर लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात; वाघोलीतील घटना

By विवेक भुसे | Updated: July 22, 2023 15:59 IST2023-07-22T15:59:07+5:302023-07-22T15:59:14+5:30

हा प्रकार वाघोलीत १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडला होता...

Woman miscarried after being kicked in the stomach in a fight over a faucet; Incidents in Wagholi | Pune: नळावरील भांडणात पोटावर लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात; वाघोलीतील घटना

Pune: नळावरील भांडणात पोटावर लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात; वाघोलीतील घटना

पुणे : नळावरील महिलांच्या भांडणाचे किस्से अनेकाना विनोदाने सांगितले जातात. पण, पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित रवी धोत्रे, रवी धोत्रे आणि शांताबाईल रवी धोत्रे (सर्व रा. गोरेवस्ती गायरान, वाघोली) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वाघोलीत १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घराजवळील सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना त्यांच्या शेजारील रोहित धोत्रे याने फिर्यादीचा नळाखालील हंडा बाजूला सरकवला. त्यावर फिर्यादी यांनी त्याला माझा नंबर आधी आहे. तू मला पाणी भरु दे. माझे झाल्यानंतर तू पाणी भर असे सांगितले. त्यावर तो शिवीगाळ करु लागले. त्याचे वडील रवी धोत्रे व आई शांताबाई धोत्रे हे सुद्धा तेथे आले. त्यांनीही शिवीगाळ करुन दमदाटी केली. त्यावर फिर्यादीने माझा नंबर पहिला आहे, मी पाणी भरते, त्यानंतर तुम्ही पाणी भरा, असे सांगितले.

तेंव्हा रोहित याने त्यांच्या गालावर चापट मारली. त्याच्या आई वडिलांनी हाताने मारहाण केली. त्यानंतर रोहित याने त्यांच्या पोटावर मारहाण केल्याने त्या नळाजवळ खाली पालथी पडल्या. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागले. त्या घरी जाऊन झोपले असताना त्यांच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी गर्भपात झाल्याचे सांगितले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कोळपे तपास करीत आहेत.

Web Title: Woman miscarried after being kicked in the stomach in a fight over a faucet; Incidents in Wagholi