शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:53 IST

मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे

मंचर : संततधार पावसामुळे घराची पडवी अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना जवळे (ता. आंबेगाव) गावच्या लायगुडेवस्तीत दुपारी दीडच्या सुमारास घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे ( वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या गावच्या माजी सरपंच आहेत. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे जवळे गावच्या लायगुडेवस्तीत धोंडीभाऊ महादू काळे हे पत्नी रंगूबाई धोंडीभाऊ काळे, मुले अजय धोंडीभाऊ काळे, गणेश धोंडीभाऊ काळे, सून लक्ष्मी अजय काळे यांच्यासोबत राहतात. काळे यांचे कौलारू घर असून स्वयंपाकासाठी पडवी बांधलेली आहे. रंगुबाई धोंडीभाऊ काळे या दुपारी घरी थांबल्या तर इतर सर्वजण शेतात कामासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पडवीत काम करत होत्या. त्यावेळी संततधार पावसामुळे भिजलेली पडवी कोसळली. पडवीचे साहित्य रंगुबाई धोंडीभाऊ काळे यांच्या अंगावर पडले. त्याखाली त्या दाबल्या गेल्या. धोंडीभाऊ काळे हे दुपारी जेवण्यासाठी घरी आले असता त्यांना घराची पडवी पडलेली दिसली. त्यावेळी शिवाजी कोंडीभाऊ लायगुडे यांच्या मदतीने रंगुबाई काळे यांना ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला त्यांना पारगाव येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. नंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी आणले असता त्या उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रंगूबाई काळे यांच्या डोक्याला व कमरेला मार लागला होता. 

भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, सतीश खालकर, रघुनाथ वाळुंज, महेश लोखंडे, अजित खालकर, सिताराम वाळूज, दिलीप लायगुडे आदी ग्रामस्थांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रंगुबाई काळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मंचर पोलिसात याबाबतची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे. रंगुबाई धोंडीबा काळे या जवळे गावच्या माजी सरपंच असून 2015 ते 2020 या काळात त्यांनी गावचे सरपंचपद भूषवले आहे. 

टॅग्स :ambegaonआंबेगावRainपाऊसWaterपाणीDamधरणDeathमृत्यू