Within 5 minutes, your dream of traveling to Pune will be fulfilled in the air; Don't want a 'hyper loop' | २३ मिनिटांत पुणे - मुंबई प्रवासाचे स्वप्न हवेतच विरणार; ‘हायपर लूप’ नको
२३ मिनिटांत पुणे - मुंबई प्रवासाचे स्वप्न हवेतच विरणार; ‘हायपर लूप’ नको

पुणे : सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून फडणवीस सरकारने मान्यता दिलेल्या, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुंबई पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकारला आहे. ‘हायपर लूप’ जगात कुठे झालेली नाही, त्यामुळे त्याची ट्रायल आपल्याकडे नको. ‘हायपर लूप’ची ट्रायल घ्यायची आपली क्षमता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुणे ते मुंबई हायपर लूप प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रूपयांचा करार केला होता़ हा प्रवास ताशी १,२२0 किलोमीटर असेल तशी त्याची रचना होती़ हायपरलूप सुरू झाल्यानंतर, वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स ते वाकड (पुणे) दरम्यानचे ११७.५ किलोमीटरचे अंतर २३ मिनिटांत पार करता येईल, असे त्यांनी सांगितले होते़ ७0 हजार कोटींच्या प्रकल्पासाठी दुबईतील कंपनी गुंतवणुकीस तयार झाली होती़ पहिला टप्पा पीएमआरडीए प्राधिकरणाच्या गहुंजे ते उस्से गावापर्यंतचा ११.८ किलोमीटरचा होता. तो अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन होते़ त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद होती़ पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यास बीकेसी ते वाकडपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन होते. त्यानुसार हा टप्पा ६ ते ८ वर्षांत पूर्ण करण्यात येणार होता़

बोगद्याचे नवीन काम हाती
पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता हायपर लूपऐवजी अन्य पर्यायाबाबत मुंबईत नुकतीच चर्चा झाली़ घाटातील बोगद्याचे काही हजार कोटींचे नवीन काम हाती घेतले असून, यामुळे वाहतूक कोंडी व वेळेची समस्या मार्गी लागेल़ तोपर्यंत हायपर लूप हे तंत्रज्ञान पुढे गेले तर त्याचा विचार करू, असे पवार यांनी सांगितले़

Web Title: Within 5 minutes, your dream of traveling to Pune will be fulfilled in the air; Don't want a 'hyper loop'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.